ETV Bharat / entertainment

सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियाडवाला ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र - सलमान खान आणि साजिद नाडियाडवाला

Salman Khan New Mass Action Movie : अभिनेता सलमान खान आणि चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपटासाठी एकत्र येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.आर. मुरुगादास करणार आहे.

Salman Khan New Mass Action Movie
सलमान खानचा नवीन ॲक्शन चित्रपट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 4:53 PM IST

मुंबई - Salman Khan New Mass Action Movie : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'भाईजान' सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्याचा आणखी एक चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. सलमान खान साऊथचा पॉवरफुल डायरेक्टर ए.आर. मुरुगादासबरोबर एक मास ॲक्शन फिल्म घेऊन येत आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहे. साजिद नाडियाडवालानं सलमानबरोबर 'जीत', 'जुडवा', 'हर दिल जो प्यार करेगा', 'मुझसे शादी करोगी', 'जान ए मन' आणि 'किक' सारखे चित्रपट केले आहेत. सलमान आणि साजिद यांनी शेवटी 2014 रोजी 'किक' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

सलमान खानचा आगामी चित्रपट : आता 10 वर्षांनंतर ही हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. या चित्रपटामध्ये सलमान पुन्हा एकदा ॲक्शन करताना दिसणार आहे. साजिद नाडियाडवाला यांनी सलमान खानबरोबर असणाऱ्या या दमदार ॲक्शन चित्रपटासाठी दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांची निवड केली आहे. हा चित्रपट 2025 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार साजिद आणि दिग्दर्शक ए.आर. मुरुगादास यांनी मास ॲक्शन चित्रपटाविषयी चर्चा केली आहे. हा एक ग्लोबल ॲक्शन एंटरटेनर चित्रपट असेल. या चित्रपटाचं चित्रीकरण अनेक देशांमध्ये केलं जाणार आहे. सलमान खान स्टारर या चित्रपटाचं बजेट बजेट 400 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.

दिग्दर्शक ए आर मुरुगदास कोण आहेत? : 2024च्या उन्हाळी हंगामात या चित्रपटाची शुटिंग सुरू होणार आहे. सलमान आणि साजिदचा हा पहिला मेगा बजेट चित्रपट असेल. दरम्यान दिग्दर्शक ए.आर. मुरुगादासबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये 'गजनी' आणि 'हॉलिडे' चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. त्याचबरोबर साऊथ चित्रपटसृष्टीत त्यांनी 'कैदी', 'दरबार', 'सरकार' असे चित्रपट केले आहेत. 2006 मध्ये मुरुगादास यांनी सलमान खानसाठी 'गजनी' हा चित्रपट लिहिला होता, परंतु हा चित्रपट आमिर खानच्या नशिबात होता. या चित्रपटामध्ये आमिरबरोबर अभिनेत्री असिन तोट्टुंकल दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.

हेही वाचा :

  1. आलिया भट्टने शेअर केला शिकारीबद्दलचा जागरूकता व्हिडिओ, म्हणाली "शिकार हा खूनच"
  2. साऊथ अभिनेता मामूट्टी स्टारर मल्याळम चित्रपट 'ब्रमायुगम'चा ट्रेलर प्रदर्शित
  3. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.