मुंबई -Salman Khan Official Notice: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या कथित यूएसए दौऱ्याबद्दल पसरवल्या जात असलेल्या खोट्या बातम्यांबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. आता सलमाननं त्याचं नाव वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर तो कायदेशीर कारवाई करू शकतो, असं त्यानं इशारा दिला आहे. गेल्या सोमवारी 'भाईजान'नं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक नोटीस पोस्ट केली होती.
सलमान खानच्या नावाचा गैरवापर : सलमान खानच्या सोशल हँडलवरील पोस्टमध्ये म्हटलं, 'सलमान खान आणि त्याची कोणतीही कंपनी किंवा टीम 2024 मध्ये यूएसएमध्ये कार्यक्रम आयोजित करत नाहीत. मिस्टर खान परफॉर्म करतील असा दावा पूर्णपणे खोटा आहे. कृपया अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही ईमेल, संदेश आणि जाहिरातीवर विश्वास ठेवू नका. फसव्या हेतूनं सलमान खानच्या नावाचा गैरवापर करताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.' सलमान खान यूएसए दौऱ्यावर जाणार या बातम्या सोशल मीडियात वेगानं पसरल्या होत्या.
सलमान खानचं वर्कफ्रंट : सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर' आणि टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. एआर मुरुगादास दिग्दर्शित 'सिकंदर' चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि काजल अग्रवाल, प्रतिक बब्बर आणि सुनील शेट्टी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच रश्मिकानं 'सिकंदर'च्या सेटवरून शूटिंगच्या पहिल्या दिवसाची झलक शेअर केली होती. साजिद नाडियादवाला निर्मित हा चित्रपट 2025च्या ईद विकेंडला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान हा अॅक्शन करताना दिसेल. 'भाईजान'चे चाहते सध्या 'सिकंदर'च्या रिलीजची वाट पाहात आहेत. दरम्यान सलमानच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर पुढं तो ' पवनपुत्र भाईजान' , 'इन्शाअल्लाह', 'नो एंट्री 2' 'किक 2', 'दंबग 4' आणि 'वांटेड 2'मध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :
- सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांनी 200 बॅकग्राउंड डान्सर्ससह 'सिकंदर'मधील गाण्याचं केलं शूट - Salman Khan And Rashmika Mandanna
- तब्बल सात वर्षांनी सलमाननं घेतली 'एक्स वहिनी' मलायकाची भेट, व्हिडिओ व्हायरल - Salman Khan met Malaika Arora
- काजल अग्रवाल सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सिकंदर'मध्ये घेणार एन्ट्री - Kajal Aggarwal in Sikandar