ETV Bharat / entertainment

पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl - SALMAN KHAN FAN GIRL

Salman Khan fan girl : पनवेलमधील सुपरस्टार सलमान खानच्या फार्महाऊसबाहेर एक 24 वर्षीय तरुणी पोहोचली. तिला सलमान खानबरोबर लग्न करायची इच्छा असल्याचं सांगण्यात येत आहे. फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.

Salman Khan
सलमान खान (सलमान खान फोटो (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 7:39 PM IST

मुंबई - Salman Khan fan girl : बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट रचणाऱ्या 4आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हे आरोपी लॉरेन्स बिश्नोई टोळीतील असल्याचं सांगण्यात येत आहे. आता पोलिसांनी दिल्लीतून एका फॅन गर्लला ताब्यात घेतलं आहे. जी सलमान खानच्या फार्महाऊसबाहेर फिरत होती. या मुलीला सलमानबरोबर लग्न करायचं असल्याचं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वतःला सलमान खानची मोठी फॅन म्हणवणारी दिल्लीतील 24 वर्षीय तरुणी पनवेल तालुक्यातील त्याच्या फार्महाऊसबाहेर पोहोचली. तिनं सलमानला भेटण्याची मागणी केली होती.

24 वर्षीय तरुणीला सलमानबरोबर करायचं आहे लग्न : ही मुलगी सलमानची मोठी फॅन असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी मुलीला सोशल अँड इव्हेंजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह (सील) नावाच्या एनजीओकडे नेले आहे. यानंतर तिला कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात मानसिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याशिवाय तिच्या आईला दिल्लीहून बोलावण्यात आल्याचेही समोर येत आहे. सलमानशी लग्न करण्याच्या उद्देशानं ती मुलगी दिल्लीहून एकटीच मुंबईत आली होती, यानंतर तिचे घरचे खूप काळजीत होते. आठ दिवस उपचार आणि समुपदेशनानंतर या महिलेला घरी नेण्यात आलं आहे.

'भाईजान'च्या सुरक्षेत वाढ : दरम्यान, बिश्नोई प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे धनंजय उर्फ ​अजय कश्यप, गौरव भाटिया उर्फ नहवी , वास्पी खान उर्फ ​वसीम चिकना आणि रिझवान खान उर्फ जावेद खान आहेत. बिश्नोईच्या धमकीनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सलमान कुठेही बाहेर जात असेल तर त्याच्याबरोबर सुरक्षा रक्षक असतात. दरम्यान 'भाईजान'च्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर तो , शेवटी 'टायगर जिंदा है 3'मध्ये दिसला होता. आता पुढं तो 'सिकंदर' आणि 'दबंग 4' याशिवाय त्याचा शाहरुख खानबरोबर 'टायगर वर्सेस पठाण' हा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालनं सोनाक्षी सिन्हाला दिल्या वाढदिवसाच्या शुुभेच्छा, केली पोस्ट शेअर - sonakshi sinha birthday
  2. रवीना टंडनवर दारूच्या नशेत वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचा आरोप, लोकांनी रस्त्यावर घेरलं - RAVEENA TANDON
  3. सुशांत सिंहच्या स्मृतीदिनानिमित्त बहीण श्वेता कीर्तीनं केदारनाथला दिली भेट, शेअर केले फोटो - Sushant Singh Rajput Sister Shweta

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.