ETV Bharat / entertainment

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान पलक तिवारीला गर्दीपासून वाचवताना झाला स्पॉट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 5:47 PM IST

Ibrahim Ali Khan and Palak Tiwar : अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री पलक तिवारीबरोबर पुन्हा एकदा एकत्र स्पॉट झाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ibrahim Ali Khan and  Palak Tiwar
इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी

मुंबई - Ibrahim Ali Khan and Palak Tiwar : अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री पलक तिवारी यांच्या अफेअरची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. त्यांच्या लिंक-अपच्या बातम्या रोजच चर्चेत असतात. दोघेही अनेकदा एकत्र वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट होतात. दरम्यान इब्राहिम आणि पलक पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. त्याचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इब्राहिम पलकचा हात पकडून तिला कारमध्ये बसताना दिसत आहे. दोन्ही स्टार किड्स एकमेकांना डेट करत असल्याचं चाहत्यांचे म्हणणं आहे. इब्राहिम आणि पलकचा हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेकांना आवडत आहे.

इब्राहिम आणि पलकचा व्हिडिओ व्हायरल : सोशल मीडियावर अनेकजण इब्राहिमचं कौतुक करताना दिसत आहे. त्याला आता त्याच्या चाहत्यानी केरिंग बॉयफ्रेंडचा टॅग दिला आहे. आता या व्हिडिओत दोघांच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर पलक तिवारीनं ब्लॅक टँक टॉप आणि ब्लॅक डेनिम परिधान केला आहे. याशिवाय इब्राहिमनं काळ्या रंगाच्या टी-शर्टवर निळ्या रंगाचा जीन्स घातला आहे. हे दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत सैफचा मुलगा आपल्या कथित गर्लफ्रेंडला गर्दीपासून वाचवताना दिसत आहे. इब्राहिम आणि पलक कुठूनतरी येत असताना पापाराझींनी त्यांना घेरलं होतं. पलक आणि इब्राहिमनं आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीही खुलासा केला नाही. दोघेही एकमेकांना आपले चांगले मित्र मानतात असे ते अनेकदा म्हणतात.

इब्राहिम आणि पलकची वर्कफ्रंट : इब्राहिम अली खान लवकरच करण जोहरच्या 'सरजमीन' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. याशिवाय तो खुशी कपूरबरोबर आणखी एक चित्रपट दिसणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक सध्या घोषीत व्हायचं आहे. पलक तिवारीबद्दल बोलायचं झालं तर तिनं याआधीच हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. गेल्या वर्षी पलकनं सलमान खान स्टारर 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला चाहत्यांनी भरभरून दाद दिली. याशिवाय तिनं एका म्युझिक अल्बममध्ये देखील काम केलं आहे.

हेही वाचा :

  1. 'रोज तुझी आठवण...', राजकुमार रावनं आईच्या आठवणीत शेअर केली भावूक पोस्ट
  2. राखी सावंतचा पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्राणीबरोबर लग्न केल्यानंतर सोमी खाननं दिली प्रतिक्रिया
  3. भारतीय वंशाच्या दिग्दर्शकाला मिळणार का ऑस्कर? वाचा, ऑस्कर 2024 नामांकनाची संपूर्ण यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.