ETV Bharat / entertainment

आयुष शर्मा अभिनीत 'रुसलान'नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली लाखात कमाई - ruslaan box office day 1 - RUSLAAN BOX OFFICE DAY 1

Ruslaan Box Office Day 1 : आयुष शर्मा स्टारर 'रुसलान'नं रिलीजच्या पहिल्या दिवशी कमी कमाई केली आहे. आता यानंतर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जास्त काळ टीकू शकणार नसल्याचं दिसत आहे.

Ruslaan Box Office Day 1
रुसलान बॉक्स ऑफिस दिवस 1
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 7:09 PM IST

मुंबई - Ruslaan Box Office Day 1 : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा 'रुसलान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 26 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. करण ललित भुतानीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात आयुष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आता 'रुसलान'या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर एक दिवस पूर्ण केला आहे. या चित्रपटात आयुष शर्माशिवाय सुश्री श्रेया मिश्रा, जगपती बाबू आणि विद्या माळवदे यांच्या देखील विशेष भूमिका आहेत. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर 'रुसलान' चित्रपटाची किती कमाई झाली याबद्दल आपण जाणून घेऊया.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'रुसलान' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 55 लाखाची कमाई केली. 'रुसलान' चित्रपटानं हिंदी पट्ट्यातील चित्रपटगृहांमध्ये 6.42 टक्के ऑक्युपन्सी रेट नोंदवला आहे. याशिवाय रात्रीच्या शोमध्ये प्रेक्षकांची काहीशी गर्दी थिएटरमध्ये पाहायला मिळाली. हा चित्रपट 25 कोटीच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. या चित्रपटाचा रन टाईम हा 2 तासाचा आहे. 'रुसलान' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ही कहाणी एका दहशतवाद्याच्या मुलाची आहे, ज्याला एका पोलीस अधिकाऱ्यानं दत्तक घेतलं आहे. सुरुवातीपासूनच रुसलान (आयुष) देशाप्रती आपले प्रेम आणि आपुलकी दाखवत असतो. यानंतर त्याला अशा गोष्टीचा समाना करवा लागतो, ज्याची त्यानं कल्पना देखील केलेली नसते.

वर्कफ्रंट : या चित्रपटामध्ये आयुष शर्मानं खूप थरारक स्टंट केलेले आहेत. याशिवाय या चित्रपटामध्ये सुनील शेट्टी एक वेगळ्या अंदाजात दिसला आहे. 'रुसलान' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवरून असं वाटत आहे की, हा चित्रपट रुपेरी पडद्यावर फार काळ टिकू शकणार नाही. या चित्रपटाला लावलेले पैसे काढणं देखील आता कठीण दिसत आहे. दरम्यान आयुष शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं त्यानं सलमान खानची निर्मित 'लवयात्री' (2018) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री वरीना हुसैन दिसली होती. 'लवयात्री' या चित्रपटामधील गाणी ही प्रचंड हिट झाली आहेत.

हेही वाचा :

  1. इलियाना डिक्रूझने दिली मायकेल डोलनशी लग्न केल्याची व एक मुलगाही असल्याची कबूली - Ileana Dcruz
  2. 'कल्की एडी 2898'च्या निर्मात्यांनी शेअर केले नवीन पोस्टर, आज होईल रिलीज तारखेची मोठी घोषणा - kalki 2898 ad
  3. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील 'रोशन सिंग सोढी बेपत्ता, जेनिफर बन्सीवालनं दिली प्रतिक्रिया... - Gurucharan Singh Missing

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.