ETV Bharat / entertainment

ड्रामा क्वीन राखी सावंत 'बिग बॉस मराठी 5'मध्ये घेणार एन्ट्री - निक्की तांबोळीचा वाजणार बॅन्ड - bigg boss marathi 5 - BIGG BOSS MARATHI 5

Bigg Boss Marathi 5: राखी सावंत 'बिग बॉस मराठी 5'मध्ये एंन्ट्री घेणार आहे. यामुळे आता अनेकजण खुश आहेत. या शोमध्ये राखीचं टार्गेट निक्की तांबोळी असणार आहे.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5 - Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 5:55 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5: ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याच दिवसांपासून लाइमलाइटपासून दूर आहे. आदिल खान दुर्रानीबरोबरचे नातं तोडल्यानंतर ती खूप चर्चेत होती. यानंतर तिला तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेश कुमार याचा पाठिंबा मिळाला. याचदरम्यान तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्यानंतर ती फराह खानच्या चॅनलवरही दिसली. आता ती थेट रितेश देशमुखच्या शो 'बिग बॉस मराठी 5'मध्ये पोहोचली आहे. राखी सावंत ही आता 'बिग बॉस मराठी'मध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस' निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये राखी ही घराच्या आत प्रवेश करताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी 5'मध्ये राखीची होईल एंट्री : व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये ती नाचत येत म्हणते, "हॅलो बिग बॉस मी परत आले आहे. तुमची पहिली बायको." हे पाहताच निक्की तांबोळी म्हणते," हाय रब्बा." यानंतर सर्व स्पर्धक फ्रिज झाल्याचे दिसतात. राखी सावंत येताच ती निक्कीला म्हणते, "निक्की... स्वस्त राखी सावंत, निक्की तांबोळी... तुला सोडून येणार आंबोली." हे ऐकून निक्की तांबोळीला राग आल्याचं दिसते. यानंतर या वाक्यवर घरातील सदस्य गालात हसताना दिसतात. आता इतक्या दिवसांनी राखी सावंतला पाहून लोकांनाही खूप आनंद झाला आहे. या प्रोमोवर अनेकजण भरभरून कमेंट्स करताना दिसत आहेत.

राखीचं टार्गेट निक्की : व्हायरल झालेल्या प्रोमोवर एका यूजरनं लिहिलं की, 'इतर कोणत्याही स्टारसाठी कधीच वाट पाहिली नाही, जेवढी राखीची पाहिली.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'राखी आली आता नक्कीला आग लागेल, आधीच बोलवायला पाहिजे होतं.' तर काहींनी ही क्लिप पाहिल्यानंतर हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत. निक्की तांबोळी आणि राखी सावंत 'बिग बॉस 14' हिंदीमध्ये एकत्र दिसल्या होत्या. याठिकाणी दोघांमध्ये जोरदार भांडण झाली होती. राखी ही घरात येताच तिनं थेट निक्की तांबोळीला टार्गेट बनवलं आहे. आजच्या एपिसोडमध्ये निक्की आणि राखी यांच्यामध्ये चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे. 28 सप्टेंबरच्या एपिसोड पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत.

हेही वाचा :

  1. एक्स पती रितेश कुमारनं राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानीबाबत केला धक्कादायक खुलासा - Rakhi Sawant
  2. हृदयविकाराच्या समस्येमुळे राखी सावंत रुग्णालयात दाखल, फोटो व्हायरल - Rakhi Sawant
  3. राखी सावंत टॉवेल आउटफिटमध्ये कार्यक्रमात झाली सहभागी, युजर्सला आली मेट गालाची आठवण - RAKHI SAWANT

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.