ETV Bharat / entertainment

राजकुमार राव यांनी प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले, केला 'या' गोष्टीचा खुलासा - Rajkummar Rao - RAJKUMMAR RAO

Rajkummar Rao : प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर राजकुमार रावनं एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आहे. ही एक अफवा असल्याचं त्यानं आता सांगितलं आहे.

Rajkummar Rao
राजकुमार राव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 10:27 AM IST

मुंबई- Rajkummar Rao : अभिनेता राजकुमार राव एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याच्या चेहऱ्यात बदल दिसत होता. या फोटोमुळे राजकुमारनं प्लास्टिक सर्जरी केली आहे का, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. आता काही लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोची तुलना 'फायटर'मधील खलनायक ऋषभ साहवानीबरोबर करण्यास सुरुवात केली. यानंतर राजकुमारनं या अफवेवर प्रतिक्रिया दिली आहे. प्लॅस्टिक सर्जरीच्या अफवांवर अखेर राजकुमार रावनं मौन सोडलं आहे. त्यानं दिलेल्या मुलाखतीत यामागील सत्य उघड करताना म्हटलं, 'जर तुम्ही माझा एक व्हायरल फोटो पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ती व्यक्ती माझ्यासारखी दिसत नाही. हे माझ्यासाठी खरोखर मजेदार होते. कारण मला माहित आहे की या चित्राशी छेडछाड केली गेली आहे. मला वाटतं कोणीतरी हा फोटो एडिट केला आहे.'

प्लास्टिक सर्जरीवर राजकुमारचा खुलासा : यानंतर त्यानं पुढं म्हटलं, 'लोक प्लास्टिक सर्जरीसारखे मोठे शब्द वापरत आहे. पण मी या अफवांना कधीच बळी पडलो नाही. होय, मी माझ्या त्वचेच्या काळजीसाठी फिलर्स नक्कीच करून घेतो.'' त्यानं नऊ वर्षांपूर्वी फिलर्स घेतल्याचं या मुलाखतीदरम्यान कबूल केलं. राजकुमारनं हा खुलासा केलानंतर आता युजर्सला आता उत्तर मिळालं आहे. त्यानं प्लास्टिक सर्जरी केली नसून हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं आहे. आता आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटोबरोबर छेडछाड केली जात आहे. याआधी देखील कतरिना कैफ, रश्मिका मंदान्ना, काजोल, सचिन तेंडुलकर अशा अनेक सेलिब्रिटींच्या फोटो आणि व्हिडिओत छेडछाड केली गेली आहे.

वर्क फ्रंट : राजकुमार रावच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच 'श्रीकांत' या चित्रपटात दिसणार आहे, जो 10 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच्या पाइपलाइनमध्ये जान्हवी कपूरबरोबर 'मिस्टर अँड मिसेस माही' देखील आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो श्रद्धा कपूरबरोबर 'स्त्री 2'मध्ये दिसणार आहे. राजकुमारचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. 'वॉर 2'च्या मुंबईतील सेटवर फ्रेंच कॉन्सुल जनरलने घेतली हृतिक रोशनची भेट, 'आदरातिथ्याबद्दल' मानले आभार - Hrithik Roshan
  2. बॉलिवूड पदार्पणाच्या 'महाराजा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी जुनैद खानच्या 'एक दिन' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण - Junaid Khan
  3. आदिल हुसैनची 'कबीर सिंग'वर कडवट टीका, संदीप रेड्डी वंगाच्या टीकेनंतरही हुसैन आपल्या मतावर ठाम - Sandeep Reddy Vanga

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.