ETV Bharat / entertainment

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर स्टारर 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - rajkummar rao and janhvi kapoor - RAJKUMMAR RAO AND JANHVI KAPOOR

Mr And Mrs Mahi First Look Poster Out : करण जोहरनं 'मिस्टर अँड मिसेस माही'ची डेट जाहीर करत फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या पोस्टमध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसत आहे.

Mr And Mrs Mahi First Look Poster Out
मिस्टर अँड मिसेस माही फर्स्ट लूक पोस्टर आउट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 4:46 PM IST

मुंबई - Mr And Mrs Mahi First Look Poster Out : निर्मात करण जोहरनं 14 एप्रिल रोजी त्याच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली होती. या चित्रपटात राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. करणच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आता या चित्रपटाला नवीन रिलीज डेट मिळाली असून आज 15 एप्रिल रोजी करणनं चित्रपटाच्या लीड स्टार कास्टचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले आहे. करणनं हे पोस्टर शेअर करत लिहिलं, "तुमच्या स्वप्नांना स्पर्श करण्याची वेळ आली आहे, आता सर्व काही तुमचे आहे, 'मिस्टर अँड मिसेस माही' 31 मे रोजी रिलीज होणार आहे."

'मिस्टर अँड मिसेस माही' फर्स्ट लूक पोस्टर रिलीज : या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलंय. त्यांनी जान्हवी कपूरबरोबर 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हा चित्रपट केला होता. आता 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी कपूर आणि राजकुमार यांनी टीम इंडियाची जर्सी परिधान केली आहे. राजकुमार रावच्या जर्सीवर महेंद्र असं नाव लिहिलं आहे. याशिवाय जान्हवीच्या जर्सीवर महिमा असं नाव आहे. या चित्रपटाची कहाणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय चित्रपटाची नवीन रिलीज डेट उघड करताना दुसऱ्या पोस्टवर करणं लिहिलं, "काही चित्रपट कहाणी आणि प्रेक्षकांच्या स्वप्नांबद्दल बोलतात. किती वेळा आपल्या जवळचे लोक आपल्या स्वप्नांच्या मार्गात येतात. 'मिस्टर अँड मिसेस माही' आमच्या हृदयाच्या जवळ आहेत.''

वर्कफ्रंट : याआधी देखील महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर एक चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत हा मुख्य भूमिकेत होता. सुशांत स्टारर 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर खूप गाजला होता. या चित्रपटासाठी सुशांतनं खूप मेहनत केली होती. दरम्यान राजकुमार राव आता आगामी 'श्रीकांत' चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट भारतीय उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांचा बायोपिक आहे. दुसरीकडे, जान्हवी कपूर या वर्षी साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय ती साऊथ स्टार राम चरणच्या 'आरसी16' या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. उर्वशी रौतेलानं जिममधून शेअर केला ज्युनियर एनटीआरबरोबरचा सेल्फी, वाचा युजर्सच्या प्रतिक्रिया - Urvashi Rautela
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' जगभरात पाचव्या दिवशी करणार 100 कोटींचा टप्पा पार - bade miyan chote miyan
  3. जान्हवी कपूरनं राधिका मर्चंटच्या ब्राइडल शॉवरमधील फोटो केले शेअर , पाहा फोटो - janhvi kapoor share pics

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.