'पुष्पा 2'चे हिंदी वितरण हक्क 200 कोटी रुपयांना विकले गेलं, रचला नवा विक्रम - pushpa 2 - PUSHPA 2
Pushpa 2 Hindi Distribution Rights : 'पुष्पा 2'चे हिंदी वितरणाचे हक्क 200 कोटीला विकले गेले आहेत. आता या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एक नवा इतिहास रचला आहे.
Published : Apr 18, 2024, 3:51 PM IST
मुंबई -Pushpa 2 Hindi Distribution Rights : 'देवरा पार्ट 1', 'गेम चेंजर' आणि 'पुष्पा 2 द रुल' हे तीन मोठे बहुप्रतीक्षित चित्रपट चालू वर्षात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहेत. 2022 नंतर 2024 हे वर्षही साऊथ चित्रपटांच्या नावावर असणार आहे. या चार पॅन इंडिया चित्रपटांच्या जागतिक आणि हिंदी वितरण हक्कांची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व चित्रपटांचे हिंदी थिएटर हक्क किती रुपयांमध्ये विकले गेले याबद्दल आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
'देवरा पार्ट 1' : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री जान्हवी कपूर आणि सैफ अली खान स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'देवरा पार्ट 1' चे हिंदी थिएटर हक्क 45 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या चित्रपटानं उत्तर भारतामध्ये रिलीजपूर्वी 45 कोटींचा व्यवसाय केला आहे. करण जोहर 'देवरा पार्ट 1' हा चित्रपट उत्तर भारतात सादर करत आहे. 'देवरा पार्ट 1' चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा कोरटाला यांनी केलंय.
'पुष्पा 2 द रूल' : जगभरातील प्रेक्षक अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या पहिल्याचं भागानं चित्रपटसृष्टीत धमाका केला होता. आता 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा जगभरातील थिएटरमध्ये राज्य करताना अल्लू दिसणार आहे. 'पुष्पा 2' या चित्रपटाचे हिंदी थिएटरचे हक्क 200 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. आता सर्व भाषांमध्ये 'पुष्पा 2'चं बाजार मूल्य 1000 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. पुष्पा 2'नं एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'आरआरआर'चे सर्व भाषांमधील थिएटरचे हक्क 900 कोटी रुपयांना विकले गेले होते. रवीना टंडनचे पती आणि चित्रपट वितरक अनिल थडानी यांनी 'पुष्पा 2'च्या उत्तर भारतातील थिएटर अधिकारांसाठी 200 कोटी रुपये ॲडव्हान्स दिले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'पुष्पा 2 द रूल'नं रचला इतिहास : मीडिया रिपोर्टनुसार 'पुष्पा 2'नं उत्तर भारतात 200 कोटी रुपयांमध्ये हक्क विकून इतिहास रचला आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांचे हिंदी हक्क 140 ते 160 कोटी रुपयांमध्ये विकले गेले होते. 'पुष्पा 2'नं आता शाहरुख खान स्टारर 'जवान' आणि 'डंकी'चा रेकॉर्ड मोडला आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
'गेम चेंजर' : राम चरण स्टारर पॉलिटिकल ड्रामा 'गेम चेंजर'ची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाची वाट चाहते आतुरतेनं पाहत आहेत. या चित्रपटाचे डिजिटल अधिकार 105 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्राइम व्हिडिओवर दिसणार आहे. याशिवाय झी तेलुगूनं या चित्रपटाचे सॅटेलाइट हक्क विकत घेतले आहेत.
हेही वाचा :
- शिल्पा शेट्टीला धक्का : राज कुंद्रा मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीनं इतक्या कोटींची संपत्ती केली जप्त - ED Attached Shilpa Shetty Property
- परिणीती चोप्रानं 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन - PARINEETI CHOPRA
- सुनील शेट्टीनं जावई केएल राहुलला 32व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, केला फोटो शेअर - KL Rahul 32nd Birthday