मुंबई - 'बाहुबली' चित्रपटाचे निर्माता केई ज्ञानवेल राजा यांनी या चित्रपटाचा तिसरा भाग बनवणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. 'बाहुबली' फ्रँचायझीमधील तिसऱ्या भागाचं अधिकृतपणे काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
एसएस राजामौली दिग्दर्शित, 'बाहुबली'चे पहिले दोन भाग (2015 मध्ये 'द बिगिनिंग' आणि 2017 मध्ये 'द कन्क्लूजन') भारतीय सिनेमात क्रांती घडवून आणणारे ठरले होते. या चित्रपटाची फ्रँचायझी केवळ कथाकथन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये एक महत्त्वाची खूण ठरली नाही तर पुष्पा, 'आरआरआर', 'केजीएफ' आणि 'कांतारा' सारख्या पॅन इंडिया ब्लॉकबस्टर चित्रपटाची सध्या जी लाट तयार झाली त्याचा पायाही रचला.
प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना निर्मात ज्ञानवेल राजाने खुलासा केला की 'बाहुबली 3' साठी चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाची टीम अलीकडेच विचारमंथन करण्यासाठी एकत्र आली होती. 'बाहुबली' चित्रपटाचे मागील दोन्ही भाग दोन वर्षाच्या अंतरानंतर प्रदर्शित झाले होते. यावेळी तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांना, पात्रे आणि कथानक यांना पुन्हा जोडण्यासाठी निर्माते थोडा जास्त कालावधी घेत आहोत. 'बाहुबली'चा पुढील भाग मोठ्या पडद्यावर येण्यापूर्वी याची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा होईल याची टीमला खात्री करायची आहे.
ज्ञानवेल राजाने पुढे या दृष्टिकोनाची तुलना इतर यशस्वी फ्रँचायझींशी केली. ज्यामध्ये अभिनेता सुर्याच्या 'सिंघम' फ्रँचायझीचा समावेश आहे. सीक्वेलमध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवण्याचे फायदेही त्यांनी अधोरेखित केले आहेत. 'कल्की 2898 एडी' आणि 'सालार' यांसारख्या इतर प्रमुख आगामी चित्रपटांसाठीही अशीच पेसिंग योजना आखली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
2017 मध्ये तिसऱ्या भागाविषयी शंका होत्या, पटकथा लेखक विजयेंद्र प्रसाद आणि मुख्य अभिनेता प्रभास यांनी कथेचा शेवट झाल्याचे संकेत दिले होते. तथापि, ज्ञानवेल राजाच्या नुकत्याच झालेल्या घोषणेने आशा नव्याने निर्माण केल्या आहेत आणि प्रभासला महिष्मती साम्राज्यात परत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 'बाहुबली 3' हा महाकाव्यात्मक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी निर्माते तयारी करत आहेत. त्यामुळे याच्या स्केल, कथाकथन आणि व्हिज्युअल्स कडूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत.