मुंबई - Pawan Kalyan Upcoming Movies: पॉवर स्टार पवन कल्याणच्या निवडणुकीत त्याच्या दमदार विजयानं त्याचे कुटुंबीय आणि चाहते आनंदी आहेत. आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षानं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. तीन दशकांहून अधिक काळ साऊथ चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या पवन कल्याणचे चाहते या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. राजकाराणात बाजी मारलेल्या या पॉवर स्टारच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घेऊया.
पवन कल्याणचा पहिला आगामी चित्रपट आहे ओजी - ओरिजनल गणगस्टर ( OG - Original Gangster ) हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असणार आहे.यामध्ये तो अभिनेता म्हणून दिसणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीही दिसणार आहे. तर प्रियांका अरुल मोहन, अर्जुन दास आणि श्रेया रेड्डी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले आहे.
पीएसपीके 29 ( PSPK 29 ) - पॉवर स्टार पवन कल्याणच्या आगामी चित्रपटांमध्ये पीएसपीके 29 ( PSPK 29 ) चा समावेश आहे. या चित्रपटाची निर्मिती सुरेंदर रेड्डी करत आहेत. राम तल्लुरी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट चालू वर्षात प्रदर्शित होऊ शकतो.
हरी हरा वीरा मल्लू ः पवन कल्याणच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांमध्ये तेलुगू पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट 'हरी हरा वीरा मल्लू'चा समावेश आहे. या चित्रपटाचे पोस्टर्स आणि टीझरने आधीच खळबळ उडवून दिली आहे. या चित्रपटात अर्जुन रामपाल, नीधी अग्रवाल, बॉबी देओल, सुनील, नासेर, नोरा फतेही, सुब्बाराजू आणि रघु बाबू देखील दिसणार आहेत. 'हरी हरा वीरा मल्लू' या चित्रपटाचे दिग्दर्शन राधाकृष्ण जगरलामुडी यांनी केले आहे. हा चित्रपट सप्टेंबर 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
उस्ताद भगतसिंग - पवन कल्याणचा आणखी एक बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजे 'उस्ताद भगत सिंग'. हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री श्रीलीला त्याच्या बरोबर दिसणार आहे. हरीश शंकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -
सोनाक्षी सिन्हानं कामाला सुट्टी न देता शूटिंग सेटवरच साजरा केला वाढदिवस - Sonakshi Sinha
'बिग बॉस ओटीटी 3'चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज - anil kapoor first look