ETV Bharat / entertainment

'फुलवंती' चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण, निर्मात्यांकडून ग्रँड सक्सेस पार्टीचं आयोजन

फुलवंती चित्रपट गेल्या 50 दिवसापासून थिएटरमध्ये सुरू आहे. शिवाय ओटीटीवरही सिनेमा प्रवाहित आहे. याबद्दल खास पार्टीचं आयोजन निर्मात्यांनी केलं होतं.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 23 hours ago

मुंबई - 'फुलवंती' या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटानं ५० दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केला आहे. रसिकांच्या उदंड प्रेमामुळं हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडच्या काळात फार कमी वेळा चित्रपट ५० दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये टिकतात. ‘फुलवंती’नं ही जादू साध्य करून दाखवली आहे. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर देखील प्रदर्शित झाला असून तिथेही 'फुलवंती'ला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या यशस्वी प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी खास सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं.

'Phulwanti' movie completes 50 days in theaters
'फुलवंती' चित्रपटाला थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण ('Phulwanti' movie PR team)

याप्रसंगी 'फुलवंती' चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अमृता खानविलकर हिनं विशेष उपस्थिती दर्शवून या पार्टीला चारचांद लावले. यावेळी प्राजक्ता आणि अमृताने 'मदनमंजिरी' या जबरदस्त लावणीवर कमालीचा परफॉर्मन्स केला. या सक्सेस पार्टीत सर्वच टीमनं हे यश साजरे केले. या चित्रपटाचे संवाद, लेखन आणि दिग्दर्शन अनुक्रमे प्रवीण विठ्ठल तरडे आणि स्नेहल प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये सांभाळली आहे. या चित्रपटातून निर्मितीत उतरलेल्या प्राजक्ता माळीसाठी पहिलंच यश खूप उत्साह वाढवणारं आहे. यामुळे तिच्यासह इतर निर्मात्यांकडून आणखी दर्जेदार मराठी चित्रपटांची अपेक्षा प्रेक्षक निश्चितपणे करत असतील.

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला 'फुलवंती' चित्रपट

छत्रपतींनंतर मराठा साम्राज्याची धुरा पेशव्यांनी सांभाळली होती. पेशव्यांच्या दरबारात एकापेक्षा एक धुरंदर योद्धे होते. त्यातील एक म्हणजे शास्त्रपारंगत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री! श्रीमंतांच्या दरबारातील साक्षात बृहस्पती असलेल्या शास्त्रींना पेशव्यांच्या दरबारात अनन्यसाधारण महत्त्व होतं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली 'फुलवंती' कादंबरी चित्रपटाच्या माध्यामातून आपल्यासमोर ठेवण्यात आली आहे. या चित्रपटात व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा दाखवण्यात येणार आहे. यामध्ये व्यंकट शास्त्रींची भूमिका अभिनेता गश्मीर महाजनी यानं साकारली आहे. या चित्रपटात पेशवाई काळातील 'फुलवंती' नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकट शास्त्री यांची दमदार कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सर्व थरातील प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद मिळाला असून ओटीटीवरही प्रेक्षक या सिनेमाचा आनंद मोठ्या संख्येनं घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.