ETV Bharat / entertainment

पाक अभिनेत्री सना जावेदनं पती शोएब मलिकबरोबर साजरा केला 31 वा वाढदिवस; फोटो व्हायरल - Sana celebrated her 31st birthday - SANA CELEBRATED HER 31ST BIRTHDAY

Pak Actress Sana Javed : अभिनेत्री सना जावेदनं पती शोएब मलिकबरोबर तिचा 31वा वाढदिवस साजरा केला आहे. या विशेष प्रसंगी शोएबनं आपल्या पत्नीला सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Pak Actress Sana Javed
पाक अभिनेत्री सना जावेद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 5:31 PM IST

मुंबई- Pak Actress Sana Javed : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच त्यानं तिसरे लग्न करून सर्वांना चकित केलं आहे. यापूर्वी त्यानं भारतीय टेनिस सेन्सेशन सानिया मिर्झाशी लग्न केलं होतं. आता त्यानं पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर तिसरे लग्न केलंय. त्यामुळे सध्या तो खूप चर्चेत आहे. आता शोएब मलिकनं पत्नी सना जावेदला लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. 30 वर्षीय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला होता.

सना जावेदचा वाढदिवस : या फोटोंमध्ये सना खूपच सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये सना फ्लोरल कुर्ता आणि जीन्समध्ये दिसत आहे. तर शोएब मलिक काळ्या रंगाच्या शर्टमध्ये आहे. दोघेही कॅमेरासमोर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत. दरम्यानं, सनाचं कुटुंब हैदराबाद डेक्कनचे आहे. तिनं कराची विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. सना 2012 पासून अभिनय जगताशी जोडली गेली आहे. 41 वर्षीय शोएब मलिकन त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेली सना जावेदबरोबर लग्न केल्यानंतर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.

शोएब मलिक ट्रोल : शोबनं शेअर केलेल्यावर फोटोवर अनेक टीका करताना दिसत आहेत. या पोस्टच्या कमेंट विभागात यूजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. शोएबला अनेकजण फटकारत आहे. एका युजरनं या पोस्टवर लिहिल, ''खरंच शोएबनं टीव्ही सोडून रिमोट विकत घेतला आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''आग लगा दी बस्ती में ये दोनो मस्ती में.'' आणखी एकानं लिहिलं, ''दोन्ही देशांमधून शिव्या येत आहे.'' दरम्यान सनानं तिच्या 12 वर्षांच्या करिअरमध्ये 24 टीव्ही मालिका आणि 4 म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. 'खैर मंगदा' (2015), 'कुबूल है' आणि 'तेरे बिना' (2017) आणि 'हमे प्यार है पाकिस्तान से' (2018) या म्युझिक व्हिडिओमध्ये ही ती दिसली होती. 'खैर मंगदा' आणि 'हमे प्यार है पाकिस्तान से' हे लोकप्रिय गाणं पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमनं गायलं आहे.

सना शोएब मलिकची तिसरी पत्नी : शोएब मलिकनं पहिले लग्न आयेशा सिद्दीकी (2002) बरोबर केलं होतं. शोएबचं पहिलं लग्न 8 वर्षे टिकले आणि 2010 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर शोएबनं 2010 मध्ये माजी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाबरोबर लग्न केलं. घटस्फोट न घेता शोएबनं सना जावेदबरोबर तिसरे लग्न केल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे.

हेही वाचा :

  1. 'उत्तरन' मालिका फेम श्रीजिता डेच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो व्हायरल, पाहा सुंदर पोस्ट - Sreejita de
  2. मुंबईच्या रस्त्यावर दिसला सैफ अली खानचा 'नवाबी' थाट, घोडागाडीतून केली सैर - Saif Ali Khan
  3. विन डिझेलनं दीपिका पदुकोण आणि दिग्दर्शक डीजे कारुसोबरोबरचा थ्रोबॅक फोटो केला शेअर - Vin Diesel

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.