ETV Bharat / entertainment

'मिर्झापूर'चा चार वर्षानंतर सीझन 3 रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षकांचा 'गजब भौकाल हैं'! - Mirzapur Season 3 X Review - MIRZAPUR SEASON 3 X REVIEW

Mirzapur 3 Review in Marathi : 'मिर्झापूर 3' ची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपलीय. मिर्झापूरचा तिसरा सीझन गुरुवारी मध्यरात्रीपासून प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या वेब सीरिजविषयी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

MIRZAPUR SEASON 3 X REVIEW
MIRZAPUR SEASON 3 X REVIEW (Source : YouTube/ Prime Video India)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 11:22 AM IST

हैदराबाद Mirzapur 3 Review in Marathi : मिर्झापूरचा तिसरा सीझन अखेर प्रेक्षकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आलाय. या सीझनची सुरुवात दुसऱ्या सीझनच्या अखेरच्या भागापासून झाल्याचं दाखवण्यात आलंय. ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या सीझनसाठी प्रेक्षकांना 4 वर्षे प्रतीक्षा करावी लागली. त्याचा पहिला सीझन 2018 मध्ये रिलीज झाला होता. तर त्याच्या 2 वर्षांनंतर 2020 मध्ये प्रेक्षकांना त्याचा दुसरा सीझन पाहायला मिळाला. परंतु, तिसरा सीझन येण्यासाठी 4 वर्षे लागली.

सोशल मीडियावर नेटिझन्स या सीझनमधील परफॉर्मन्स, ट्विस्ट आणि टर्नची चर्चा करत आहेत. मिर्झापूर 3 मध्ये विजय वर्मा, रसिका दुग्गल, पंकज त्रिपाठी, श्वेता त्रिपाठी आणि अली फजल मुख्य भूमिकेत आहेत. सोशल मीडियावर या सीझनविषयी संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. जर तुम्ही या वीकेंडला मिर्झापूर 3 पाहण्याचा विचार करत असाल, तर याबद्दल नेटिझन्स काय म्हणताय हे एकदा जाणून घ्या.

एक्सवरील प्रतिक्रिया : 'मिर्झापूर 3' विषयी आपलं मत मांडताना एका यूजरनं म्हटलंय की, "प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर मिर्झापूर 3 आलाय. आशा आहे की सीझन 3 हा सीझन 2 आणि सीझन 1 पेक्षा अधिक दमदार असेल. पण मुन्ना भाईशिवाय तो अपूर्णच वाटेल." तर दुसऱ्या एका यूजरनं टिप्पणी केली की, "सीझन 3 आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्व सीझन्सपैकी वाईट आहे. यामुळं माझे 10 हून अधिक तास वाया गेले. मला विश्वासच बसत नाही की त्यांना ही स्टोरी समोर आणायला 4 वर्षे लागली. गोलू आणि गुड्डूला चालना देण्यासाठी प्रत्येक पात्र ज्यामध्ये थोडीशी धार होती. ते अचानक बाजूला केले गेले. हे अतिशय वाईट आहे."

"हा किती निरुपयोगी सीझन होता. केवळ कचरा. अक्षरशः कोणताही संवाद नाही, कोणतीही कथा नाही. मी आत्तापर्यंत याचे 8 भाग बघितले. मात्र, अजूनही त्याचा काहीच अर्थ लागत नाहीये", अशी टिप्पणीही एका यूजरनं केलीय.

हेही वाचा -

  1. कालिन भैय्याचा धाक आणि गुड्डू पंडितच्या दहशतीनं उडवला थरकाप, 'मिर्झापूर 3' चा खतरनाक ट्रेलर रिलीज - Mirzapur 3 Trailer released
  2. 'मिर्झापूर सीझन 3'चा ट्रेलर होईल 'या' दिवशी रिलीज, पाहा तारीख - Mirzapur Season 3 Trailer
  3. क्राईम थ्रिलर वेब सीरीज 'मिर्झापूर सीझन 3'च्या ट्रेलर रिलीजची तारीख आली समोर - MIRZAPUR SEASON 3 TRAILER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.