ETV Bharat / entertainment

'नवरा माझा नवसाचा 2'चं सचिन पिळगावकर यांनी शेअर केलं पहिलं पोस्टर, चित्रपट कधी होईल रिलीज जाणून घ्या - sachin pilgaonkar - SACHIN PILGAONKAR

Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. सचिन पिळगावकर यांनी हे पोस्टर शेअर करून चाहत्यांना एक भेट दिली आहे.

Navra Maza Navsacha 2
नवरा माझा नवसाचा 2 (sachin pilgaonkar -instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 4:38 PM IST

मुंबई - Navra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवासाचा-2' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. येत्या 20 सप्टेंबरला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचं एक पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या या पोस्टरची बरीच चर्चा होताना दिसत आहे. सचिन पिळगावकर यांनी आपल्या इंन्स्टाग्राम पेजवर या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये जबरदस्त धमाल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलय.

'नवरा माझा नवसाचा 2'चं पोस्टर लॉन्च : याशिवाय या चित्रपटामधील संवाद संतोष पवार यांनी लिहिले आहेत. यावेळी 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल, कारण यावेळी या चित्रपटामधील प्रवास ट्रेननं होईल. पहिल्या भागात म्हणजेच 'नवरा माझा नवसाचा'मध्ये हा प्रवास एसटी महामंडळाच्या बसनं करण्यात आला होता. 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटात सचिन पिळगावकर व्यतिरिक्त अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव आणि निर्मिती सावंत हे कलाकार दिसणार आहेत. दमदार स्टारकास्ट असल्यानं यावेळचा प्रवास हा धमाकेदार असेल.

'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटात अशोक सराफ यांची भूमिका : सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली होती. आता तब्बल 19 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल येत आहे. त्यामुळे अनेकजण खूप आनंदी आहेत. 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये अशोक सराफ टीसीच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी त्यांनी 'नवरा माझा नवसाचा'मध्ये लालू कंडक्टरची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली होती. 'नवरा माझा नवसाचा 2'मधील अशोक सराफ यांचा फर्स्ट लूक समोर आला होता, प्रेक्षकांनी त्यांच्या फर्स्ट लूकचं देखील खूप कौतुक केलं होतं.

हेही वाचा :

  1. सचिन पिळगावकर स्टारर 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटिंग झालं सुरू
  2. 19 वर्षांनंतर येतोय 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा सीक्वेल, अशोक सराफ असणार 'या' भूमिकेत! - Navra Maja Navsacha 2
  3. "हे भजन गाताना प्रत्यक्ष राम समोर असल्याचा अनुभव आला", सचिन पिळगावकरांची ETV Bharat शी खास बातचित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.