मुंबई - Mahesh Babu and Namrata Shirodkar : साऊथ चित्रपटसृष्टीतील सुपरहिट स्टार जोडपे महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांच्या मुलीच्या संदर्भात एक बातमी समोर आली आहे. त्यांची मुलगी सितारा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत असताना तिचे फेक अकाउंट बनवण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केल्याचं उघड झालंय. ही माहिती कळताच तातडीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नम्रतानं केली पोलीस तक्रार : दरम्यान सिताराच्या फेक इंस्टाग्राम अकउंटबद्दलची बातमी आता समोर येत आहे. या प्रकरणी महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर या जोडप्यानं एक पोस्ट शेअर करून आपल्या मुलीचे फेक इंस्टाग्राम अकाउंट बनवणाऱ्या व्यक्तीला इशारा दिला आहे. सिताराची आई नम्रतानं फेक इंस्टाग्राम अकाउंट बनणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. नम्रता आणि तिची प्रोडक्शन कंपनी जीएमबी एंटरटेनमेंटनं याबाबतची माहितीही सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सिताराच्या फेक इंस्टाग्राम अकाउंटबद्दलची माहिती दिली आहे. आता हे अकाउंट डिलीट करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या पोस्टमध्ये नम्रतानं सांगितलं की, या अकाउंटवर अनेकजण ट्रेडिंग आणि गुंतवणूकबद्दलच्या लिंक पाठवत होते.
नम्रता शिरोडकर दिला इशारा : आपल्या मुलीच्या सुरक्षेचा विचार करून, नम्रतानं यावर एक वॉर्निंग नोट जारी केली आहे, ज्यामध्ये तिनं लिहिलं की, ''सावध राहा, माधापूर पोलिसांनी आमच्या सिताराच्या फेक इंस्टाग्राम अकाउंटबद्दलची माहिती टीम जीएमबीकडून घेतली आहे. सायबर क्राईमबद्दलची ही चेतावणी दिली गेली आहे. अज्ञात गुन्हेगारानं सिताराचे फेक अकाउंट तयार केले आहे. या अकाउंटच्या माध्यामातून व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या लिंक पाठवल्या जात होत्या, मी तुम्हाला विनंती करते की सिताराच्या अधिकृत खात्याशिवाय इतर कोणत्याही खात्यावर विश्वास ठेवू नका.'' नम्रताच्या या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय तिला याप्रकरणी सर्वजण पाठिंबा देताना दिसत आहेत.
हेही वाचा :