ETV Bharat / entertainment

'देवरा' इव्हेंट रद्द झाल्यानंतर चाहत्यांमध्ये निराशा, ज्यु. एनटीआरनं केलं फॅन्सचं सांत्वन - Devara pre release event - DEVARA PRE RELEASE EVENT

'देवरा: भाग 1' चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी हैदराबादमध्ये प्रचंड गर्दी झाल्यानं आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यानंतर चित्रपटाच्या टीमनं आणि ज्युनियर एनटीआर यांनी निराशा व्यक्त केली. 'देवरा: भाग 1' 27 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.

Devara Event Cancellation
'देवरा: भाग 1' प्री-रिलीज इव्हेंट ((Photo: Film poster/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2024, 1:19 PM IST

हैदराबाद - 'देवरा' चित्रपटाचा पहिला भाग 27 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यामुळे ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांमध्ये अमाप उत्साह पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा प्री रिलीज इव्हेंन्ट हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पावसामुळे झालेली अव्यवस्था आणि चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गर्दी उसळली. परिणामी सुरक्षा व्यवस्था कोलमडून पडली. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्सही उन्मळून पडले. यानंतर आयोजकांनी 'देवरा' प्री रिलीजचा कार्यक्रम रद्द केल्यानं ज्युनियर एनटीआरच्या टाहत्यांमध्ये निराशेची लाट पाहायला मिळाली.

ज्युनियर एनटीआरटीची मुख्य भूमिका असलेला 'देवरा भाग 1' ची सिनेप्रेमींमध्ये अफाट उत्सुकता निर्माण झाल्याचं चित्र आहे. यासाठीच निर्मात्यांनी 22 सप्टेंबर रोजी, चित्रपटाच्या प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी एक प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित केला होता. परंतु ऐनवेळी पडलेला जोरदार पाऊस आणि इतर काही कारणांमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. यानंतर निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एक निवेदन प्रसिद्ध करुन दिलगीरी व्यक्त केली आहे.

'देवरा भाग 1' च्या टीमनं आपली निराशा व्यक्त करताना म्हटले आहे की, "आम्ही या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो कारण या चित्रपटासाठी आम्ही अनेक वर्षे कठोर परिश्रम केले आहेत. खास करुन आमच्या लाडक्या 'मॅन ऑफ मासेस' एनटीआरचे हे पहिले सोलो रिलीझ असल्यानं आम्हाला तो क्षण 6 वर्षांनी मोठ्या प्रमाणावर साजरा करायचा होता."

असे असले तरी गणेश उत्सवाचा काळ यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजनावर परिणाम झाला. त्यानंतर कार्यक्रमाच्या तारखेच्या आधी पडलेला मुसळधार पाऊस, यामुळे वाहतूकीमध्ये अडथळे निर्माण झाले. कार्यक्रमाच्या दिवशी हवामान साफ ​​झाले होते तरी, ग्राऊंड इव्हेंटसाठी परिस्थिती अयोग्य राहिली.

निवेदनात अधिक तपशीलवार म्हटले आहे की, "आमच्या सर्वोतोपरी प्रयत्नांनंतरही चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली." यानंतर चित्रपटाच्या टीमनं कार्यक्रम रद्द करण्याचा कठीण निर्णय घेतला. त्यांनी कबूल केले की अनेक चाहत्यांनी भाग घेण्यासाठी लांबचा प्रवास केला होता आणि प्रत्येकाच्या सुरक्षित घरी परतण्याची आशा व्यक्त केली.

"आम्ही गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत आणि निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मनापासून दिलगीरी व्यक्त करत आहोत. तुमच्या समजूतदारपणाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. टीम देवरा," असं निवेदनात म्हटलं आहे.

ज्युनियर एनटीआरने 'देवरा' प्री-रिलीझ इव्हेंट रद्द केल्याबद्दल निराशा व्यक्त केली. चाहत्यांना दिलेल्या व्हिडीओ संदेशात तो म्हणाला, "'देवरा' चित्रपटाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं मला खूप दुःख झालं आहे. मी त्याची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. मला तुमच्याबरोबर वेळ घालवण्यात आणि 'देवरा'विषयी अनेक मनोरंजक डिटेल्स शेअर करण्यात आनंद वाटतो. 'देवरा' बद्दलचे अनेक किस्से सांगायला आणि चित्रपटात केलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी मी उत्सुक होतो, पण कार्यक्म रद्द झाल्यानं तुमच्या पदरी आलेल्या निराशेचं मलाही दुःख आहे." ज्यु. एनटीआरनं निर्मात्यांचा बचाव करताना म्हटलं की, "कार्यक्रम रद्द करण्यासाठी निर्माते किंवा आयोजकांना दोष देणं चुकीचे आहे, असं मला मनापासून वाटतं."

कोराटला सिवा दिग्दर्शित, 'देवरा: भाग 1' मध्ये सैफ अली खान, जान्हवी कपूर, श्रुती मराठे, प्रकाश राज आणि श्रीकांत यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे आणि चाहते निःसंशयपणे रिलीजची प्रतीक्षा करत आहे.

हेही वाचा -

  1. बियॉन्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'देवरा पार्ट 1'चा ग्लोबल प्रीमियर, भारतीय चित्रपटाला पहिल्यांदा मान - Global Premier at Beyond Fest
  2. सोलो रिलीज 'देवरा'बद्दल 'चिंताग्रस्त' ज्युनियर एनटीआर, ट्रेलर लॉन्चच्या वेळी केलं भाष्य - Devara Trailer
  3. 'देवरा पार्ट 1'मध्ये जूनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत झळकणार, नवीन पोस्टर व्हायरल - jr ntr

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.