ETV Bharat / entertainment

'मुंज्या' चित्रपटात कोल्हापूरच्या आयुष उलगड्डेचा धुमाकूळ, अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना कसं मिळवलं यश? - munjya film News - MUNJYA FILM NEWS

Ayush ulgadde Interview : कोल्हापुरातील शिंदे थिएटर अकॅडमीत अभिनयाचे धडे गिरवणाऱ्या आयुषनं अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलंय. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा गल्ला जमवलेल्या "मुंज्या" चित्रपटातील या अभिनेत्यानं कोल्हापूरमधील अनुभव सांगितला.

Ayush ulgaddi Interview
Ayush ulgaddi Interview (Source - ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 9:37 AM IST

Updated : Jul 7, 2024, 10:29 PM IST

कोल्हापूर Ayush ulgadde Interview : मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या "मुंज्या" या हिंदी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेला बालकलाकार आयुष उलगड्डे हा मूळचा कोल्हापूरचा आहे. या बालकलाकारानं अप्रतिम अभिनय करत सर्वांचंचं लक्ष वेधून घेतलं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात आलेल्या आयुषनं 'ईटीव्ही भारत' ला खास मुलाखत दिली. या चित्रपटातील चित्रीकरणावेळीचे अनुभव त्यानं सांगितले. तसंच कोल्हापूरकरांनी दाखवलेलं प्रेम विसरू शकत नाही, अशा भावनाही त्यानं व्यक्त केल्या.

आयुष उलगड्डेची खास मुलाखत (Source - ETV Bharat Reporter)

आयुषनं 'या' मालिकांमध्ये केलंय काम : 7 जून रोजी प्रदर्शित झालेल्या "मुंज्या" या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारलेला कोल्हापूरचा बालकलाकार आयुष उलगड्डे यानं आपला प्रवास उलगडला. कोल्हापुरातील उंचगाव इथं आई-वडिलांसोबत राहणाऱ्या आयुषनं कोल्हापुरातीलच शिंदे थिएटर अकॅडमीत अभिनयाचे धडे गिरविले. राजा राणीची गं जोडी, 'ढ' लेकाचा, संत गजानन शेगावीचे, दख्खनचा राजा ज्योतिबा अशा मालिकेतून तो मराठी प्रेक्षकांसमोर आला. त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित पहिल्या हिंदी चित्रपटात मुख्य बालकलाकाराच्या ऑडिशनपासून चित्रीकरणापर्यंतचा प्रवास रंजक असल्याचं आयुषनं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं. "घरात कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नव्हती. मला इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायला मिळालं. पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांना सेटवर पाहून पहिल्यांदा मला अश्रू अनावर झाले," अशा भावना आयुषनं व्यक्त केल्या. "मुंज्या" चित्रपटातील भूमिकेमुळं कोल्हापूरवासियांना आणि माझ्या मित्रांना खूप आनंद झाल्याचं यावेळी आयुषनं सांगितलं.

आयुष पुढं म्हणाला, "मुंज्या चित्रपट चांगला कमवेल असं वाटलं होतं पण असं वाटलं नव्हत की, एकदम 100 करोड. स्टोेरीवरती, प्रत्येक कलाकाराच्या अभिनयावरती आमचा चित्रपट खुप चांगली प्रगती मिळवेलं हेही मला माहिती होत." यावेळी बोलताना त्यानं चित्रपटातील फेमस डायलॅाग 'तेरे गुलाबजाम मिठे होंगे' आपल्या खास शैलीत बोलुन दाखवला.

'मुंज्या' चित्रपटात आयुष चमकला : आयुषनं या चित्रपटात गोट्या नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तो वयानं मोठ्या असलेल्या मुन्नीसोबत लग्न करण्याचा हट्ट करतो. तिला मिळवण्यासाठी अघोरी कृत्य करतो. यातच त्याला आपला जीव गमावा लागतो. तब्बल 70 वर्षानंतर मुन्नीला मिळवण्यासाठी केलेला प्रवास या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे.

हेही वाचा

  1. 'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात छप्परफाड कमाई - Kalki 2898 AD Box Office Collection
  2. 'पक्षी इवल्याशा चोचीने आभाळ पिऊन टाकतो'; 'नाना छंद' या गीतांच्या अल्बमचं मुंबईत प्रकाशन - Nana Patekars song album
  3. अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'औरों में कहाँ दम था'ची नवीन रिलीज डेट आली समोर - auron mein kahan dum tha

Last Updated : Jul 7, 2024, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.