ETV Bharat / entertainment

'सही रे सही' च्या विक्रमी 'सही' प्रयोगाला राज ठाकरे यांची 'सही' डायलॉगबाजी - Raj Thackeray Praises Bharat Jadhav - RAJ THACKERAY PRAISES BHARAT JADHAV

Raj Thackeray Praises Bharat Jadhav : मराठी अभिनेता भरत जाधव ची 'चतुरंगी' भूमिका असलेलं 'सही रे सही' नाटकानं मराठी रंगभूमीवर एक नवा उच्चांक प्रस्थापित केला. या नाटकाचा 4444 वा प्रयोग बोरीवलीतल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला. या प्रयोगासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरत जाधवचं भरभरुन कौतुक केलं.

Raj Thackeray Praises Bharat Jadhav
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 7:11 AM IST

Updated : Aug 16, 2024, 12:26 PM IST

मुंबई Raj Thackeray Praises Bharat Jadhav : मराठी रंगभूमीवरील एक निर्मळ मनाचा आणि तितकाच प्रतिभावान अभिनेता अशी भरत जाधवची ओळख आहे. गिरणगावात जन्मलेला, तिथेच लहानाचा मोठा झालेला, 'महाराष्ट्राची लोकधारा' या शाहीर साबळे यांच्या सदाबहार कार्यक्रमात लहान भूमिका करणारा भरत जाधव ते व्हॅनिटी व्हॅनचा मालक झालेला मराठी रंगभूमी आणि चित्रपटांमधला पहिला सुपरस्टार असा भरत जाधवचा प्रवास 'संघर्षातून यशाचा' आहे. ऑल दि बेस्ट, अधांतर, जन्मसिद्ध सारख्या नाटकांमधून विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा भरत आज एक यशस्वी अभिनेता आणि नाट्यनिर्माता आहे. त्याच्या यशाचा आलेख उंचावण्याच्या कामात मदन सुखात्मे, हरी, गलगले, रंगा यांचा मोठा वाटा आहे. ही सर्व नावं भरतने सही रे सही नाटकात साकारलेल्या चतुरंगी व्यक्तिरेखांची आहेत, हे नाट्यरसिकांना सांगायची गरजच नाही. प्रचंड दमछाक करणारे सही रे सही नाटकाचे प्रयाेग भरत करतोच कसा, याबद्दल दिग्गज कलाकारांनाही अप्रूप वाटत असतं. भरतची यशाची गाडी मात्र 'सही रे सही' च्या ट्रॅकवर भरधाव निघालेली असतानाही या नाटकाचा हुकमी एक्का भरत मात्र अजूनही विनम्रतेच्या ट्रॅकवर आहे. भरत जाधव ची प्रमुख भूमिका असलेल्या 'सही रे सही' या नाटकाचा 4444 वा प्रयोग गुरुवारी बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात रंगला. भरत जाधवच्या 'सही रे सही'चे अनेक चाहते आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यातले एक! गुरुवारी 4444 व्या प्रयोगनिमित्त अभिनेता भरत जाधव आणि त्याच्या निर्मितीसंस्थेनं राज ठाकरे यांना नाटकाच्या प्रयोगासाठी विशेष निमंत्रण दिलं होतं. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर आपल्या शैलीत अभिनेता भरत जाधवच्या 'सही रे सही' नाटकातील एक डायलॉग राज ठाकरे यांनी सांगितला, त्यामुळे नाट्यगृह दणाणून गेलं.

राज ठाकरे यांनी सांगितला नाटकातील डायलॉग : राज ठाकरे आणि मराठी कलाकार यांचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हे राज ठाकरे यांच्या घरी अनेकदा येत-जात असतात. केदार शिंदे लिखित, दिग्दर्शित भरत जाधवच्या 'सही रे सही' या नाटकाच्या 4444 व्या प्रयोगानिमित्त राज ठाकरेंनी या नाटकातील किस्सा सांगितला. ते म्हणाले, "मी एखाद्या कार्यक्रमात जातो तेव्हा निवेदक म्हणतात, ''आम्हाला कल्पना आहे. तुम्ही राज ठाकरे यांचं भाषण ऐकायला आलेला आहात. पण, त्यापूर्वी या या व्यक्ती भाषण करतील. माझा नंबर हा सर्वात शेवटी येतो. आज झालेल्या कार्यक्रमात देखील असंच झालं. निवेदकानं सांगितलं तुम्ही राज ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेले आहात. पण, त्याआधी या या मंडळींचं भाषण होईल, असं म्हणता म्हणता आठ जणांची भाषणं झाली. मी इथं पावणे बारा वाजता कार्यक्रमात पोहोचलो होतो आणि दोन वाजता तो कार्यक्रम संपला. माझ्या घरी देखील काही बैठका होत्या. त्यामुळे मला लवकर जायचं होतं. त्यावेळी मला भरत आठवला. अण्णा जेवायला ... जेवायला..." राज ठाकरे यांच्या या खुसखुशीत शैलीतल्या भाषणामुळे उपस्थित नाट्यरसिकांची हसता हसता पुरेवाट झाली.

भरत जाधव यांचा मोठा चाहता वर्ग : भरत जाधवचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचं साधं राहणीमान आणि तितकाच तोडीचा अभिनय, यामुळे गेली तीन दशकं अभिनेता भरत जाधवने मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. अशा या अभिनेत्याचं कौतुक करण्यात राज ठाकरे देखील मागे राहिलेले नाहीत. "इतकं यश मिळाल्यानंतर देखील जमिनीवर कसं राहावं, हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडं कुठंही दिसलेलं नाही. हे वाक्य मी टाळ्या मिळवण्यासाठी म्हटलेलं नाही. भरत जाधव यांचं 'सही रे सही' हे नाटक मी अनेकदा पाहिलं आहे. 'वस्त्रहरण, तो मी नव्हेच' ही नाटकं त्या काळात खूप चालली. कारण त्यावेळी ओटीटी किंवा इतर मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म नव्हते. मात्र, आज सर्व काही तुमच्या जवळ आहे. अशा परिस्थितीत देखील भरत जाधव यांचं नाटक 'हाऊसफुल्ल' होणं ही सोपी गोष्ट नव्हे. फावड्यानं आतमध्ये काय काय आलं याची मला कल्पना नाही. पण, त्याचा माज कधी येऊ दिला नाही. 15 ऑगस्ट म्हटलं की मला शोले आठवतो, पण आता 15 ऑगस्ट म्हटलं की 'सही रे सही' देखील आहे. मला वाटतं 'सही रे सही' म्हणजे मराठीतला 'शोले'च आहे. इतके प्रयोग करूनही ज्याचं मन भरत नाही तो भरत जाधव.'' असं म्हणत राज ठाकरे यांनी अभिनेता भरत जाधव यांच्या साधेपणाचं आणि त्यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं.

हेही वाचा :

"माझ्या नादी लागू नका, तुम्हीच खाक व्हाल..."; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्लावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया - Raj Thackeray Tweet

जरांगेंच्या आडून शरद पवार, उद्धव ठाकरेंचं राजकारण - राज ठाकरे यांचा गंभीर आरोप - Raj Thackeray

राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते मग नाटकांनाच निर्बंध का? - भरत जाधव

Last Updated : Aug 16, 2024, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.