ETV Bharat / entertainment

'किलर सूप' वेब सीरीजनं जिंकली चाहत्यांची मनं, मनोज वाजपेयी आहे दुहेरी भूमिकेत! - किलर सूप

Killer Soup :'किलर सूप' ही वेब सीरीज सध्या खूप चर्चेत आहे. या वेब सीरीजमध्ये मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेननं दर्जेदार अभिनय केला आहे.

Killer Soup
किलर सूप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 2:04 PM IST

मुंबई - Killer Soup : नेटफ्लिक्सच्या 'किलर सूप' या वेब सीरीजची कहाणी सध्या खूप गाजत आहे. या वेब सीरीजमध्ये मनोज बाजपेयीनं दुहेरी भूमिका साकारली आहे. कोंकणा सेननं किलर सूप'मध्ये उत्तम अभिनय केला आहे. या वेब सीरीजमध्ये तमिळ, इंग्रजी आणि हिंदी भाषांचा वापर करण्यात आलाय. 'किलर सूप'चं दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केलंय. याशिवाय या वेब सीरीजची कहाणी अभिषेक चौबे, अनंत त्रिपाठी, उनैजा मर्चंट आणि हर्षद नलावडे यांनी लिहिली आहेत. 'किलर सूप'मध्ये मनोज बाजपेयी, कोंकणा सेन व्यतिरिक्त सयाजी शिंदे, नस्सर, कानी कुश्रुती, अनुला नवलेकर आणि इतर कलाकारांनी जबरदस्त अभिनय केला आहे.

'किलर सूप' कधी झाली प्रदर्शित : ही एक कॉमेडी क्राईम थ्रिलर वेब सीरीज आहे. याची कहाणी स्वाती (कोंकणा) आणि प्रभू (मनोज), उमेश पिल्लई (मनोज) यांच्याभोवती फिरणारी आहे. या मर्डर मिस्ट्रीमधील कोंकणा आणि मनोजच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. ही वेब सीरीज 11 जानेवारी 2024 प्रदर्शित झाली. 'किलर सूप'द्वारे कोकणा आणि मनोज सारखे अनुभवी कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. 'किलर सूप'ची सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्याबद्दल बोलयचं झालं तर या वेब सीरीजमध्ये डार्क कॉमेडी आहे. ही वेब सीरीज खूप मनोरंजक आहे.

'किलर सूप' कहाणी : प्रभाकर शेट्टी (मनोज बाजपेयी यांनी साकारलेली पहिली व्यक्तिरेखा) आणि स्वाती शेट्टी (कोंकणा सेन शर्मा) तामिळनाडूतील मेनझूर येथे राहत असतात. प्रभाकर शेट्टी आणि स्वाती शेट्टी एकमेकांपासून आपली गुपिते लपवण्याचा प्रयत्न करतात. लग्नाच्या 20 वर्षानंतर, स्वाती प्रभाकरवर नाखूष राहते. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंड उमेश पिल्लई (मनोज बाजपेयीने साकारलेली दुसरी व्यक्तिरेखा) सोबत अफेअर सुरू करते. स्वातीच्या अनैतिक संबंधाची माहिती प्रभाकरला कळल्यावर तो स्वातीला मारण्याचा प्रयत्न करतो. मात्र, यादरम्यान असे काही घडते की प्रभाकरला आपला जीव गमवावा लागतो. या वेब सीरीज कहाणी येथून सुरू होते.

  • दरम्यान, किलर सूपप्रमाणंच खुनाची घटना हैदराबादमध्ये घडली होती. नर्स असलेल्या महिलेनं प्रियकराच्या मदतीनं खून केला होता. त्यानंतर प्रियकर हाच नवरा असल्याचं भासविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रियकरानं मटण सूप घेण्यास नकार दिल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला होता.

हेही वाचा :

  1. 'महाराष्ट्र शाहीर'चा 'या' दिवशी होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
  2. 'देसी गर्ल'चा पती निक जोनसनं मुंबई कॉन्सर्टमध्ये केली धमाल; तापसी पन्नूनं शेअर केला व्हिडिओ
  3. कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, गायक राहत फतेह अली खाननं बदलला 'सूर'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.