ETV Bharat / entertainment

बॉक्स ऑफिसवर टक्कर देणाऱ्या चित्रपटात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोण मारणार बाजी? - maidaan vs bmcm - MAIDAAN VS BMCM

Maidaan Vs BMCM Advance Booking : 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. आता बॉक्स ऑफिसवर कुठला चित्रपट बाजी मारेल, हे काही दिवसात समजेल.

Maidaan Vs BMCM Advance Booking
'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान' ॲडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 2:38 PM IST

Updated : Apr 6, 2024, 3:20 PM IST

मुंबई - Maidaan Vs BMCM Advance Booking : अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण हे दोन मोठे स्टार बॉक्स ऑफिसवर आपापल्या चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर टक्कर घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि दुसरीकडे अजय देवगणचा स्पोर्ट्स बायोपिक 'मैदान' सध्या प्रचंड चर्चेत आहे. आता दोन्ही चित्रपटांचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कुठला चित्रपट वरचढ ठरत आहे, हे पाहूया.

'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'मैदान'चे ॲडव्हान्स बुकिंग : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 'मैदान'नं 7.4 लाख आगाऊ तिकिटांची विक्री केली आहे. दुसरीकडे 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटानं 1.19 लाख तिकिटांची विक्री केली आहे. आता 'मैदान'नं रिलीजपूर्वीच बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. बॉक्स ऑफिसवर रिलीजपूर्वी 'मैदान' चित्रपटानं 24.35 लाख तर 'बडे मियाँ छोटे मियाँ'नं 9.17 लाखांची कमाई केली आहे.

'मैदान' चित्रपटाबद्दल : 'मैदान' चित्रपटाचं दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केलंय. या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल संघाचे माजी प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे. 'मैदान' चित्रपटात अजयबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगणचे चाहते 'मैदान' चित्रपटाची अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाबद्दल : अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि आलिया इब्राहिम दिसणार आहेत. याशिवाय पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अली अब्बास जफर, जॅकी भगनानी, वाशु भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एन्टरटेन्मेंट आणि एएझेड फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर धोकादायक स्टंट करताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. प्रेमिकांच्या चेहऱ्यासमोरील पुस्तकं हटली, चेहरे पाहून चुकले चाहत्यांचे सर्व अंदाज - PYAR KE DO NAAM MOVIE
  2. टायगर श्रॉफने उघडले सेलेब्रिटी फिटनेस सेंटर, एक्स दिशा पटानीनं लावली नव्या बॉयफ्रेंडबरोबर हजेरी - Tiger Shroff fitness center
  3. 'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर गाठला 100 कोटींचा टप्पा, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई - THE GOAT LIFE

Last Updated : Apr 6, 2024, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.