मुंबई - Krishna Janmashtami 2024 : देशभरात आज 26 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. मंदिरांपासून बाजारपेठेपर्यंत सर्वत्र नंदगोपाल जन्मोत्सव साजरा केला जात आहे. चित्रपटसृष्टीमध्येही हा महोत्सव खूप जल्लोषानं साजरा केला जात आहे. आता अनेक स्टार्स या विशेष प्रसंगी शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, सनी देओल, शिल्पा शेट्टी, मनोज बाजपेयी, माधुरी दीक्षित आणि रकुल प्रीत सिंग यांनी आपापल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीजवर कृष्णाचे मोशन पोस्टर शेअर केले आहेत.
अनुपम खेर : अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर कृष्णाच्या फोटोची एक क्लिप शेअर केली आहे. यात कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे, "तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा. देव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. कृष्ण कृष्ण हरे हरे । जय बांके बिहारी लाल म्हणा."
भारती सिंग : सर्वांना हसवणारी राणी भारती सिंगनं तिचा मुलगा गोल उर्फ लक्ष्य आणि पती हर्ष लिंबाचिया यांचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत गोल हा कृष्णाच्या रुपात दिसत आहे. याशिवाय हर्ष हा आपल्या मुलाला दह्यानं भरलेलं मडकं फोडण्यास सांगताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.
शोभिता धुलिपालानं चाहत्यांना दिल्या शुभेच्छा : साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालानं साखरपुड्यानंतर तिचा पहिला कृष्ण जन्माष्टमीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कृष्णाच्या रुपात दिसत आहे. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "जन्माष्टमीच्या शुभेच्छा'. या फोटोवर अनेकजण कमेंट्स करून तिला जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. याशिवाय या फोटोवर काहीजण या विशेष प्रसंगी देखील तिला नागा चैतन्यबरोबरच्या नात्यामुळे ट्रोल करताना दिसत आहेत. अनेकजण या पोस्टवर साऊथ अभिनेत्री समांथा रुथ प्रभुला पाठिंबा देत शोभिता आणि नागाला खडेबोल सुनावताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "दुसऱ्याचा आनंद लुटून तुम्ही कधीही चमकू शकत नाही. दुसऱ्यानं लिहिलं" तुझ्या पालकांनी तुला चांगले संस्कार दिले नाहीत." आणखी एकानं लिहिलं, "भगवान कृष्णाच्या पोशाखात तू फक्त वाईट आत्मा आहेस. तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभत नाही. माफ कर पण हे खरं आहे."