ETV Bharat / entertainment

विजय सेतुपतीचा 'महाराजा' पाहून कतरिनानं केली प्रशंसा, 'अतिउत्कृष्ट कथाकथना'चंही केलं कौतुक - Katrina Kaif Praises Maharaja - KATRINA KAIF PRAISES MAHARAJA

Katrina Kaif Praises Maharaja : कतरिना कैफनं विजय सेतुपती याची भूमिका असलेला 'महाराजा' हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर यातील कथाकथनाच्या स्टाईलबद्दल आणि विजयच्या अभिनयाबद्दल कतरिनानं कौतुक केलं आहे. विजय आणि कतरिना यांनी यापूर्वी 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

Katrina Kaif Praises Maharaja
'महाराजा' पाहून कतरिनानं केली प्रशंसा ((ANI/Film Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 12:31 PM IST

मुंबई - Katrina Kaif Praises Maharaja : अभिनेत्री कतरिना कैफ शहरातील दैनंदिन व्यवहारापासून दूर राहून काही काळ सुट्टीचा आनंद घेण्यात मग्न आहे. यादरम्यान, तिनं 'मेरी ख्रिसमस' या तिच्या गाजलेल्या चित्रपटाचा सहकलाकार विजय सेतुपतीचा लेटेस्ट रिलीज 'महाराजा' चित्रपट पाहिला. हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर खूप पाहिला जात आहे. चित्रपट पाहिल्यानंतर कतरिना भारावून गेल्याचं तिच्या परीक्षणावरुन दिसतं. यामधील विजयच्या भूमिकेचं तिनं खूप कौतुक केलंय. 'महाराजा' चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या सोशल मीडियावर याबद्दलची आपली प्रतिक्रिया तिनं पोस्टमधून कळवली आहे.

Katrina Kaif Praises Maharaja
'महाराजा' पाहून कतरिनानं केली प्रशंसा ((Katrina Kaif Instagram Story))

कतरिनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये 'महाराजा'विषयी आपलं मत व्यक्त केलंय. थ्रिलर चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना कतरिनानं लिहिलं, "काय चित्रपट आहे... अतिउत्कृष्ट कथाकथन." उत्साह वाढवणाऱ्या शब्दांसह तिनं अभिनेता विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप यांना टॅग केलं आणि दिग्दर्शक निथिलन समीनाथन यांचं जोरदार कौतुक केलं.

कतरिनाने साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीबरोबर 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीची अनेकांनी प्रशंसा केली होती. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा त्यांचा एकत्र रिलीज झालेला अखेरचा चित्रपट होता.

'मेरी ख्रिसमस'चे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी याआधी खुलासा केला होता की विजयनं चित्रपटाच्या सेटवर नवीन घटक आणल्यामुळे कैफ सुरुवातीला फारशी कन्फर्टेबल नव्हती. परंतु ती जेव्हा सेटवर आली तेव्हा तिनं विजयच्या कल्पनांचा विचार केला, असं राघवन यांनी सांगितलं होतं.

"कतरिना खूप मेहनत करणारी अभिनेत्री आहे. तिला प्रत्येक गोष्टींचा तपशील बारकाईनं समजून घ्यायचा असतो. तिला सीन्स बद्दल अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात आणि त्याचं उत्तर मिळेपर्यंत ती समाधानी नसते. विजयचं अगदी याच्या विरुद्ध आहे. तो संवादाबद्दल आपल्या काही सूचना करतो किंवा त्याच्या पात्राबद्दल सूचवतो आणि मी नेहमी अशा कल्पना स्वीकारण्यासाठी मनमोकळा असतो.", असं दिग्दर्शक राघवनं सांगितलं. असं असलं तरी, कतरिना आणि विजय यांच्यातील कॉमन गोष्टी शोधण्यात आणि शेवटी समजूत काढण्यात यश आलं.

'महाराजा' चित्रपटाबद्दल सांगायचं तर या थ्रिलर चित्रपटामध्ये नटराजन सुब्रमण्यम, अभिरामी गोपीकुमार, सिंगमपुली, अरुलडोस आणि ममता मोहनदास यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 14 जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि 12 जुलै रोजी ओटीटीवर ऑनलाइन उपलब्ध झाला. हा विजयचा 50 वा चित्रपट आहे.

हेही वाचा -

विकी कौशलनं दिली कतरिना कैफबरोबर काम करण्याबद्दल प्रतिक्रिया - vicky kaushal and katrina kaif

'शीला की जवानी' ते 'काला चष्मा'पर्यंत प्रत्येक गाण्यावर बेभान नृत्य करणाऱ्या कतरिना कैफचा वाढदिवस - Katrina Kaif Birthday

कतरिना कैफ गरोदर असल्याच्या 'गुड न्यूज'मध्ये तथ्य नाही, 'बॅड न्यूज' प्रमोशनमध्ये विकी कौशलचा खुलासा - Katrina Kaif pregnant rumor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.