मुंबई - Kartik Aaryan Chandu Champion : अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत कार्तिकनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. चाहत्यांनीही कमेंट सेक्शनमध्ये प्रतिसाद देत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कार्तिकनं इंस्टा स्टोरीवर 'चंदू चॅम्पियन'मधील काही दृश्य शेअर केले आहेत. याशिवाय कार्तिकनं एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्यानं 'चंदू चॅम्पियन'च्या रेटिंगबद्दल सांगितलं आहे.
कार्तिक आर्यनचं चाहत्यांनी केलं कौतुक : आता कार्तिकनं शेअर केलेल्या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं की, "कार्तिक आर्यननं यात उत्कृष्ट अभिनय केला आहे, त्यानं या चित्रपटाद्वारे स्वत:ला बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलंय." दुसऱ्यानं या पोस्टवर लिहिलं, "या उत्तम चित्रपटासाठी त्याचं आणि कबीर खानचं अभिनंदन, आम्हाला कार्तिकला अधिकाधिक चित्रपटगृहांमध्ये पाहायला आवडेल." आणखी एकानं लिहिलं, "कार्तिक आर्यनसारखा कोणीचं दुसरा स्टार नाही, त्यानं या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे." याशिवाय काही चाहत्यांनी या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आपले प्रेम व्यक्त केलं आहे.
'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर कमाल : कार्तिक आर्यनच्या 'चंदू चॅम्पियन'नं एका चांगल्या वीकेंडनंतर आता 25 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं चौथ्या दिवशी देशांतर्गत जवळपास 6.01 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन आता 30.12 कोटींवर पोहोचलं आहे. 'चंदू चॅम्पियन'चा एकूण हिंदी व्याप 20.67% होता. त्यात मुंबई, पुणे, जयपूर आणि चेन्नई आघाडीवर आहे. हा चित्रपट भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या भूमिकेसाठी कार्तिकनं सुमारे 18 किलो वजन कमी केलं होतं. 'चंदू चॅम्पियन' 14 जून रोजी प्रदर्शित झाला होता. याशिवाय आता कार्तिक 'भूल भुलैया 3'साठी देखील चर्चेत आहे. हा चित्रपट ऑक्टोबर 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :