मुंबई - Kartik Aaryan : सध्या अभिनेता कार्तिक आर्यन त्याचा आगामी चित्रपट 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकतंच त्यानं मुंबईत चित्रपटाचं पहिलं शेड्यूल पूर्ण केलं आहे. त्यानंतर तो जर्मनीला रवाना झाला. कार्तिक हा फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी जर्मनीला गेला असल्याचं समजतंय. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं कार्तिक आर्यनला फुटबॉलचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवडलं आहे. दरम्यान, जर्मनीत फिरणाऱ्या कार्तिकला आपल्या पाळीव श्वान काटोरीची आठवण झाली आहे. कार्तिकला फिरत असताना एक रोबोटिक श्वान दिसला. यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल आली.
कार्तिक आर्यन केला व्हिडिओ शेअर : जर्मनीच्या रस्त्यावर फिरायला निघालेल्या कार्तिक आर्यननं आपल्या फोनमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या रोबोटिक श्वानचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि नंतर हा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, "जर्मनीमध्ये काटोरी ही वेगळी दिसत आहे". कार्तिक जर्मनीच्या म्युनिक या सुंदर शहरात आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कबरोबरच्या भागीदारीचा एक भाग म्हणून, कार्तिक वर्षभरात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर मार्की फुटबॉल टूर्नामेंट आणि लीगच्या 900 हून अधिक सामन्यांसह थेट फुटबॉलचा प्रचार करताना दिसणार आहे. या फुटबॉल खेळामध्ये यूईएफए यूरो 2024, यूईएफए चॅम्पियन्स लीग, यूईएफए यूरोप लीग लीग, यूईएफए कॉन्फ्रेंस, यूईएफए नेशंस लीग, बुंडेसलीगा, एमिरेट्स एफए कप, डूरंड कप आणि रोशन सऊदी लीग यांचा समावेश आहे.
'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल : दरम्यान, कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3' चित्रपटाबद्दल बोलयचं झालं तर, या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर विद्या बालन, तृप्ती दिमरी, राजपाल यादव, माधुरी दीक्षित आणि इतर कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी यांनी केलंय. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाकडून कार्तिकला खूप अपेक्षा आहेत. याआधी कार्तिक हा 'भूल भुलैया 2'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. याशिवाय कार्तिक हा 'चंदू चॅम्पियन', 'आशिकी 3' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
हेही वाचा :