ETV Bharat / entertainment

'इंडियन 2' च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'ची संथ सुरुवात - Kamal Haasan vs Akshay Kumar

Kamal Haasan vs Akshay Kumar : कमल हासन स्टारर 'इंडियन 2' आणि अक्षय कुमारच्या 'सरफिरा' यांच्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. या चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला असून कमाईसाठी दोन्ही चित्रपटात मोठी स्पर्धा होऊ शकते. कमल हासनचा चित्रपट मात्र प्रमोशनच्या पातळीवर सध्या तरी आघाडीवर आहे.

Kamal Haasan vs Akshay Kumar
'इंडियन 2' च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद (Kamal Haasan and Akshay Kumar (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 11, 2024, 12:58 PM IST

मुंबई - Kamal Haasan vs Akshay Kumar : अक्षय कुमार स्टारर 'सरफिरा' चित्रपटाची टक्कर कमल हासनच्या 'इंडियन 2' बरोबर होत आहे. 12 जुलै रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचं काउंटडाऊन सुरू झालं आहे. एस. शंकर दिग्दर्शित 'इंडियन 2' चे आज तामिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील प्रीमियर एकाच दिवशी पार पडत आहे. 'इंडियन 2' आणि 'सरफिरा' या चित्रपटाच्या ग्रँड रिलीजच्या आगाऊ तिकीट बुकिंगला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

तमिळमध्ये 'इंडियन 2', हिंदीमध्ये 'हिंदुस्तानी 2' आणि तेलुगुमध्ये 'भारतीयुडू 2' असे शीर्षक असलेला हा चित्रपट यावर्षीचं सर्वात महत्त्वाच्या रिलीजपैकी एक आकर्षण आहे. हा चित्रपट एक अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव देईल अशी अपेक्षा आहे. इंडियन बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कने अहवाल दिला आहे की 'इंडियन 2' बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करु शकते. या चित्रपटाचं बजेट 250 कोटी रुपये आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवसासाठी आगाऊ बुकिंगमध्ये वाढ झाली आहे.

'इंडियन 2' नं तामिळमध्ये अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून एकूण 1.23 कोटी रुपये आणले. याव्यतिरिक्त, तेलुगू आणि हिंदी आवृत्त्यांनी अनुक्रमे 46,540 रुपये आणि 18,740 रुपये योगदान दिलं आहे. 'इंडियन 2' नं भारतातील सर्व भाषांमध्ये रु. 1,23,70,065 (1.24 कोटी) ची एकत्रित कमाई केली आहे. चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवशी हा सिनेमा यशस्वी ठरेल अशी अपेक्षा आहे.

'सरफिरा'बद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने 23.33 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. 3142 पेक्षा जास्त स्क्रीनिंगसाठी जवळपास 11878 सीट्स विकल्या गेल्या आहेत. अक्षयची लोकप्रियता पाहता या चित्रपटाला गती मिळेल असा अंदाज आहे. 'सरफिरा' हे 2020 च्या तमिळ चित्रपट 'सूरराई पोत्रू'चे हिंदी रूपांतर आहे. यामध्ये सुर्या आणि अपर्णा बालमुरली मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट कॅप्टन गोपीनाथ यांची कथाकथन करतो, ज्यांनी देशातील पहिली कमी किमतीची विमानसेवा स्थापन केली आणि भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात क्रांती घडवली.

देशभरात फक्त काही कार्यक्रम आयोजित करून 'सरफिरा'च्या प्रमोशनला फारसा वेळ निर्मात्यांनी दिलेला नाही. सुधा कोंगारा दिग्दर्शित हा चित्रपट खरोखर चांगला असल्याचे वृत्त असूनही, चित्रपटासाठी प्रेक्षकांचा उत्साह विशेष उत्साहवर्धक नाही. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात परेश रावल, सीमा बिस्वास, राधिका मदन यांच्या भूमिका आहेत, तर सुर्यानं एक छोटीशी भूमिका केली आहे.

'इंडियन 2' बद्दल बोलायचं झालं तर, कमल हसन वीरशेखरन सेनापतीची भूमिका साकारत आहे आणि सिद्धार्थ चित्रा वरधराजनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग, एस.जे. सूर्या, बॉबी सिम्हा, विवेक, आणि प्रिया भवानी शंकर यांनीही आरती, ब्रह्मानंदम आणि समुथिराकणी यांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. कमल हासन स्टारर 'इंडियन 2'चा प्री रिलीज इव्हेंट होणार 'या' दिवशी - indian 2 pre release event
  2. 'इंडियन 2' मधून परतलेल्या सेनापतीचं नेटिझन्सकडून जोरदार स्वागत, ट्रेलरनं देशभर निर्माण केली हवा - Indian 2 Trailer
  3. प्रत्येक क्षणाला मतीगुंग करणारा 'सरफिरा'चा ट्रेलर लॉन्च, प्रेक्षकांना चक्रावून सोडण्यासाठी अक्षय कुमार सज्ज - Sarafira trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.