ETV Bharat / entertainment

प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजपूर्वी दीपिका पदुकोणचं नवीन पोस्टर केलं रिलीज - Kalki 2898 AD - KALKI 2898 AD

Kalki 2898 AD: प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज करण्यापूर्वी निर्मात्यांनी दीपिका पदुकोणचं नवीन पोस्टर शेअर केलंय. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 10 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी (दीपिका पदुकोण -रणवीर सिंग (फाइल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 5:23 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD : साऊथ अभिनेता प्रभासचा आगामी 'कल्की 2898 एडी' चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 10 जून रोजी निर्माते चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार आहेत. दरम्यान रिलीजपूर्वी या चित्रपटातील दीपिका पदुकोणचं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे नाराज असल्याचे दिसत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर दीपिका पदुकोणचं जबरदस्त पोस्टर शेअर करत लिहिलं, "तिच्यापासून आशा सुरू होते. 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे.' पोस्टरची पार्श्वभूमी भविष्यवादी आणि भयावह आहे.

दीपिका पदुकोणचं 'कल्की 2898 एडी'मधील पोस्टर रिलीज : 'कल्की 2898 एडी' या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडी' हा कलियुगात होणाऱ्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये मनुष्य भविष्यात घडणाऱ्या आव्हानांना तोंड देताना दिसेल. दरम्यान दीपिका पदुकोणचा पती अभिनेता रणवीर सिंगनं पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पोस्टरच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यानं फायर इमोजीसह लिहिले, 'बूम, स्टनर.' लिहिलं आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात दीपिका पदुकोण व्यतिरिक्त प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन यांसारख्या कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 600 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित करण्यात आला आहे. 'कल्की 2898 एडी' चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहात आहेत.

'कल्की 2898 एडी' चित्रपटाबद्दल : या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन हा अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी या चित्रपटामधील एक क्लिप रिलीज करण्यात आली होती. या क्लिपमध्ये अमिताभ बच्चन भविष्याबद्दल बोलताना दिसले होते. दरम्यान एका रिपोर्टनुसार दीपिका या चित्रपटात देवी लक्ष्मीची भूमिका साकारत आहे, तिचे नाव पद्मा असेल. तिच्या भूमिकेबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या चित्रपटात प्रभास 'भैरवा'ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये कमल हसन खलनायकची भूमिका साकारताना दिसेल. दरम्यान दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. साऊथ अभिनेता नितीन स्टारर 'रॉबिनहूड'च्या टीमनं सेटवर रामोजी राव यांना वाहिली आदरांजली... - RAMOJI RAO PASSES AWAY
  2. कंगना रनौतच्या झापडच्या घटनेवर हृतिक रोशनचं काय आहे मत? - hrithik roshan
  3. फिल्मी दुनियेत रामोजी रावांचाच दबदबा; 'ईटीव्ही मराठी'च्या माध्यमातून दिल्या सुपरहिट मालिका - Ramoji Rao passed away

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.