ETV Bharat / entertainment

जूनियर एनटीआर आणि प्रशांत नील 'ड्रॅगन' चित्रपटात करणार एकत्र काम - Jr NTR Next Film is Dragon - JR NTR NEXT FILM IS DRAGON

Jr NTR Next Film is Dragon : ज्युनियर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा आज करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव 'ड्रॅगन' असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील करणार आहे.

Jr NTR Next Film is Dragon
जूनियर एनटीआरचा समोरचा ड्रॅगन चित्रपट (जूनियर NTR (NTR 31 Makers - Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 5:37 PM IST

मुंबई - Jr NTR Next Film is Dragon : ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी आज 20 मे हा दिवस खूप खास आहे. आज ज्युनियर एनटीआर त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. ज्युनियर एनटीआरला कुटुंबीय आणि मित्रांकडून या विशेष प्रसंगी भरभरून प्रेम मिळत आहे. आता ज्युनियर एनटीआरनं चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलंय. त्याचा पुढील चित्रपट 'केजीएफ' फेम दिग्दर्शक प्रशांत नीलबरोबर आहे. आता या चित्रपटाची शूटिंग तारीख आता समोर आली आहे. या चित्रपटाचे शीर्षक 'ड्रॅगन' असल्याचं सांगण्यात येत आहे. 'ड्रॅगन'चं शूटिंग ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

ज्युनियर एनटीआरचा आगामी चित्रपट : रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआर आणि प्रशांत नील यांच्या 'ड्रॅगन'चं प्री-लूक पोस्टर आज रिलीज होऊ शकते, असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटाच्या प्री- प्रॉडक्शनवर सध्या काम सुरू आहे. ज्युनियर एनटीआर 'देवरा पार्ट 1 'शूटिंगमध्ये सध्या व्यग्र आहे. याशिवाय नील हे साऊथ सुपरस्टार प्रभासबरोबर 'सालार पार्ट 2' या चित्रपटावर सध्या काम करत आहे. 20 मे 2022 रोजी प्रशांत नील आणि ज्युनियर एनटीआर यांनी 'एनटीआर 31' चित्रपटाची घोषणा करत एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ज्युनियर एनटीआरचा मोनोक्रोम लुक दिसत होता. आता या चित्रपटाचं शीर्षक समोर आल्यानंतर अनेकजण या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

'देवरा पार्ट 1' कधी होईल प्रदर्शित : ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1' 10 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कोराटला शिवा यांनी केलंय. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाचं बजेट 300 कोटीचं आहे. 'देवरा पार्ट 1'ची शूटिंग ही काही हैदराबादमध्ये झाले आहे. याशिवाय या चित्रपटाचं गोव्यातील शेड्यूल खूप सुंदर असल्याचं जान्हवी कपूरनं एका पोस्टद्वारे सांगितलं होतं. या चित्रपटाला संगीत अनिरुद्ध रविचंदर हे देत आहे. दरम्यान, ज्युनियर एनटीआरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'वॉर 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवालानं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात केली प्रार्थना, फोटो व्हायरल - shefali jariwala
  2. करण जोहरनं 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर शेअर करून केलं कार्तिक आर्यनचं कौतुक - kartik aryan
  3. यामी गौतम आणि आदित्य धर झाले पालक, केली पोस्ट शेअर - Yami Guatam and aditya dhar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.