ETV Bharat / entertainment

'हीरामंडी'मधील 'गजगामिनी वॉक'ची जान्हवी कपूर आणि राजकुमार राव उडवली खिल्ली - Janhvi Kapoor And Rajkummar Rao - JANHVI KAPOOR AND RAJKUMMAR RAO

Heeramandi Gajagamini Walk : 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'ची स्टार्स जोडी राजकुमार राव आणि जान्हवी कपूरनं संजय लीला भन्साळींच्या पहिल्या वेब सीरीज 'हीरामंडी'मधील 'गजगामिनी वॉक'ची खिल्ली उडवली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Heeramandi Gajagamini Walk
हीरामंडी गजगामिनी वॉक (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 1:54 PM IST

मुंबई -Heeramandi Gajagamini Walk : 'हीरामंडी द डायमंड बाजार' वेब सीरीजमधील 'गजगामिनी वॉक' हा सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या वेब सीरीजमध्ये 'गजगामिनी वॉक' करताना अदिती राव हैदरी दिसली आहे. 'हीरामंडी द डायमंड बाजार' भारतातील सर्वात महागडी वेब सीरीज असल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडिया युजर्स आता 'गजगामिनी वॉक' करून अनेक रिल्स बनवून शेअर करत आहेत. दरम्यान 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील स्टार्स राजकुमार आणि जान्हवी कपूर सध्या त्यांच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राजकुमार आणि जान्हवी आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी वॉक' करत खिल्ली उडवताना दिसत आहे.

जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा व्हिडिओ व्हायरल : हा व्हिडिओ जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपटासाठी केलेल्या नेट प्रॅक्टिसचा आहे. यामध्ये जान्हवी पूर्ण क्रिकेट किट आणि हातात बॅट घेऊन दिसत आहे. आता स्वतः जान्हवी कपूरनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत राजकुमार राव धमाल करताना दिसत आहे. त्याला पाहून जान्हवी हसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत जान्हवीनं लिहिलं आहे की, "आमचा स्वतःचा गजगामिनी वॉक', या क्रिकेट पॅडची सवय व्हायला एक मिनिट लागला पण मला आनंद झाला की मी 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' चित्रपटातून तुमचं मनोरंजन करू शकले."

'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'ची स्टार कास्ट : 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' 31 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. करण जोहरच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केलंय. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि राजकुमार राव व्यतिरिक्त झरीना वहाब, कुमुद मिश्रा, राजेश शर्मा, अभिषेक बॅनर्जी, पूरनेंदु भट्टाचार्य आणि हितेश भोजराज दिसणार आहेत. दरम्यान 'हीरामंडी द डायमंड बाजार' ही वेब सीरीज खूप गाजली आहे. याम वेब सीरीजमधील सेट आणि अभिनेत्रींचा पोशाख हा खूप आकर्षक असल्यानं याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2 द रुल' अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'सुसेकी' गाण्याची झलक रिलीज - Pushpa 2
  2. 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'लव्ह इन व्हिएतनाम'चा फर्स्ट लूक रिलीज - love in vietnam
  3. 'द अकादमी'नं 'कलंक'मधील आलिया भट्टचा डान्स व्हिडिओ केला शेअर - THE ACADEMY GHAR MORE PARDESIYA

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.