ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन आणि सबा आझादनं घेतला फिल्म डेटिंगचा आनंद, घातला ब्रेकअपच्या अटकळींना आळा - Hrithik Roshan and Saba Azad - HRITHIK ROSHAN AND SABA AZAD

Hrithik Roshan and Saba Azad Movie Date : हृतिक रोशन आणि त्याची प्रेयसी सबा आझाद रविवारी मुंबईतील पीव्हीआर थिएटरमध्ये स्क्रिनिंगसाठी हजर राहिली होती. ही जोडी बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसली. त्यांच्या एकत्र येण्यानं त्यांच्या ब्रेकअपच्या अफवांना आळा बसला आहे.

Hrithik Roshan and Saba Azad
हृतिक रोशन आणि सबा आझाद ((ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 12:25 PM IST

मुंबई - Hrithik Roshan and Saba Azad Movie Date : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या रिलेशनशिपमध्ये बिनसल्याच्या बातम्या मनोरंजन जगतात पसरलेल्या असताना रविवारी रात्री या जोडीनं फिल्म डेटिंगच्या आनंद घेतला. डेडपूल अँड वॉल्व्हरिनच्या स्क्रिनिंगसाठी हे दोघेही मुंबईच्या पीव्हीआर थिएटरमध्ये हजर होते. कॅज्युअल पोशाखात आलेल्या दोघांच्या बॉडीलँग्वेजकडे पाहिलं तर दोघं आनंदात असल्याचं आणि त्यांच्या नात्यात काहीही बिघडलं नसल्याचं स्पष्ट दिसत होतं.

हृतिकने सबाला घेऊन स्क्रिनिंगला हजेरी लावल्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांना अर्थ नसल्याचं स्पष्ट झालं. चित्रपटाच्या प्रीमियरसाठी येताना हे जोडपं खूपच सुंदर दिसत होतं. निवांत संध्याकाळी थिएटरमध्ये येत असताना हृतिक सबाला लीड करत होता. सबानं त्याच्याकडे फोन दिला आणि आत जात असताना त्याचा हात पकडून ती चालत राहिली.

यावेळी हृतिकनं ऑलिव्ह ग्रीन टी शर्ट, ब्लू जीन्स आणि ऑलिव्ह ग्रीन कॅपवर ब्लॅक जॅकेट घातलं होतं. सबाने निळ्या रंगाचा बॅगी शर्ट आणि काळे जेगिंग घातलं होतं. या दोघांनीही कॅज्युअल पोशाख घातला होता आणि मास्क घातलं होतं.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न आणि फराह खानची आई मेनका इराणी यांचं निधन या दोन आधीच्या कार्यक्रमांमध्ये सबाची अनुपस्थिती चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. हृतिकला बाहेर फिरताना काही वेळा सबाबरोबर नसल्यामुळे या ब्रेकअपच्या अटकळी वाढल्या होत्या.

याआधी हृतिक त्याची मुलं आणि माजी पत्नी सुझैन खानबरोबर डिनरसाठी बाहेर जाताना दिसला होता. नेहमी हृतिकच्या बरोबर असणारी सबा आझाद त्यावेळी त्याच्या बरोबर नव्हती. यामुळेच त्यांच्या ब्रेकअपच्या अफवा वाढत गेल्या होत्या.

याशिवाय एका युजरनं हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला होता की, सबा आझादच्या प्रत्येक गाण्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या हृतिकनं तिच्या अलीकडे रिलीज झालेल्या गाण्याचं मात्र जाहीरपणे समर्थन केलं नव्हतं. त्यामुळे अनेक सोशल मीडिया युजर्सनी असा निष्कर्ष काढला की त्यांच्यामध्ये सर्व गोष्टी ठीक सुरू नाहीत. या पार्श्वभूमीवर ते दोघे एकत्र आनंदात दिसल्यामुळे या सर्व अफवा दूर झाल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.