ETV Bharat / entertainment

अजय देवगण स्टारर 'दृष्यम'चा हॉलिवूड रिमेक होणार या उल्लेखामुळे मोहनलालचे चाहते भडकले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 3:27 PM IST

Drishyam Hollywood Remake : 'दृष्यम'च्या हॉलिवूड रिमेकच्या घोषणेने सोशल मीडियावर फूट पडली आहे. यूएस कंपन्यांच्या गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि JOAT फिल्म्ससह पॅनोरमा स्टुडिओने हॉलीवूडच्या रीमेकची घोषणा केल्यानंतर हा चित्रपट चर्चेत आला. 'दृष्यम' हा अजय देवगणचा चित्रपट असल्याचा उल्लेख झाल्यामुळे मोहनलालचे चाहते नाराज झाले आहेत.

Drishyam Hollywood Remake
'दृष्यम'चा हॉलिवूड रिमेक

मुंबई - Drishyam Hollywood Remake : अजय देवगण स्टारर 'दृश्यम' चित्रपटाचा हॉलिवूडमध्ये रिमेक होत असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर सुपरस्टार मोहनलालचे चाहते खवळले आहेत. गल्फस्ट्रीम पिक्चर्स आणि JOAT फिल्म्स या अमेरिकन कंपन्यांसह पॅनोरमा स्टुडिओ निर्मित 'दृश्यम' चित्रपटाचा हॉलिवूड रिमेक होणार आहे. या घोषणेनंतर या नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मोहनलाल आणि मीना यांच्या भूमिका असलेला 'दृश्यम' पहिल्यांदा 2023 मध्ये मल्याळम भाषेत बनला. त्यानंतर 2015 मध्ये या चित्रपटाचा अजय देवगण, तब्बूसह हिंदीत रिमेक झाला. त्याच्या यशामुळे 2022 मध्ये 'दृष्यम 2' चा हिंदी सिक्वेल आला, ज्याने जगभरात 356 कोटींहून अधिक कमाई केली होती.

जीतू जोसेफ दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनीत मूळ मल्याळम चित्रपटाचे चाहते, हॉलिवूडचा रिमेक अजय देवगणच्या 'दृश्यम' चित्रपटाचा असल्याचा दावा केल्यामुळे नाराज झाले आहेत. ते X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली निराशा व्यक्त करत आहेत.

एका युजरने पोर्टलला फटकारले, "दृश्यम चित्रपटाला अजय देवगणचा चित्रपट म्हणण्याचा निर्लज्जपणा, हे अज्ञान आहे! हा संपूर्ण चित्रपट अभिनेता मोहनलाल अभिनीत जीतू जोसेफने बनवलेला मल्याळम चित्रपट आहे." दुसऱ्या युजरने या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि इतरांना ते "जीतू जोसेफ आणि मोहनलाल यांचाच दृश्यम" असल्याचे मान्य करण्याचा आग्रह धरला.

मल्याळम सिनेमाला जागतिक मान्यता मिळाल्याचा आनंद साजरा करताना, दुसऱ्या युजरने लिहिले, "दृश्यम, हा जीतू जोसेफ यांनी लेखन दिग्दर्शन केलेला मोहनलाल अभिनीत चित्रपट आता ग्लोबल होत आहे."

एका सामान्य माणसाने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांना मागे टाकण्याच्या प्रयत्नांचे चित्रण असलेला दृश्यम हा एक हिट भारतीय थ्रिलर आहे. आता हा चित्रपट हिंदीमध्ये तयार होईल. वायकॉम 19 आणि मोशन पिक्चर्स या हिंदी चित्रपट निर्मिती करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसनी या मूळ चित्रपटाच्या निर्मात्याकडून दृष्यम आणि त्याचा सिक्वेल या दोन्हीसाठी आंतरराष्ट्रीय रिमेकचे हक्क विकत घेतले आहेत. ते सध्या अनेक आंतरराष्ट्रीय आवृत्त्या सेट करण्याच्या प्रक्रियेत आहेत.

हेही वाचा -

  1. नेपोटिझम वादावर चर्चा करणाऱ्या कंगनाला सहा वर्षानंतर गडकरींकडून मिळालं 'समाधानकारक' उत्तर
  2. रजनीकांतला इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून सहप्रवाशांना गगन ठेंगणे
  3. जीतू भैय्या नव्या आव्हानासाठी पुन्हा सज्ज, 'कोटा फॅक्टरी सीझन 3' चा टीझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.