ETV Bharat / entertainment

सनी देओलचे 'बॉर्डर 2' ते 'लाहोर 1947'सह 'हे' धमाकेदार चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज - SUNNY DEOL

19 ऑक्टोबरला बॉलिवूडचा 'तारा सिंग' उर्फ ​​सनी देओलचा 66वा वाढदिवस आहे. आता त्याच्या आगामी चित्रपटांवर एक नजर टाकूया...

Happy Birthday Sunny Deol
सनी देओलला वाढदिवसाच्या शुभेच्छा (सनी देओलचा वाढदिवस (ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 18, 2024, 5:31 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार सनी देओलनं 'गदर 2'मधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत सनी देओलचे नाव 7 चित्रपटांशी जोडले गेले आहे. त्याचबरोबर सनीनं काही चित्रपटांवर कामही सुरू केलंय. 19 ऑक्टोबर 1957 रोजी जन्मलेल्या सनी देओलनं बॉक्स ऑफिसवर अनेक स्मॅश हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्याचा दमदार आवाज आणि ॲक्शन सीन्स आजही प्रेक्षकांना आवडतो.

सनी देओलचे आगामी चित्रपट : 'गदर 2'द्वारे रुपेरी पडद्यावर पुन्हा स्टारडम मिळवल्यानंतर, सनी त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणखी बरेच चित्रपट घेऊन येत आहे, ज्यात 'बॉर्डर 2', 'गदर 3', 'लाहोर 1947' सारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारा सनी देओल साऊथच्या 'एसडीजीएम' चित्रपटात दिसणार आहे. हे चित्रपटाचे नाव तात्पुरते असले तरी, ऑक्टोबर 17 रोजी निर्मात्यांनी घोषणा केली की , ते सनी देओलच्या वाढदिवसाला 'एसडीजीएम'चं अधिकृत शीर्षक आणि रिलीजची तारीख जाहीर करतील. या चित्रपटाची घोषणा 20 जून 2024 रोजी करण्यात आली आहे.

बॉर्डर 2 : सनी देओलच्या 1997मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा करण्यात आली होती. अलीकडेच, निर्मात्यांनी खुलासा केला होता की, सनी देओलबरोबर, सुनील शेट्टीचा लाडका मुलगा अहान शेट्टी देखील या चित्रपटात शत्रूंशी लढताना दिसणार आहे. याशिवाय वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ देखील या चित्रपटात असणार आहेत. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित होणार आहे.

लाहोर 1947 : राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर 1947' हा चित्रपट सनी देओलच्या देशभक्तीपर चित्रपटांच्या यादीत आहे. या चित्रपटात आमिर खान सनी देओलबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रीती झिंटा देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बाप : सनी देओलकडे आगामी चित्रपट 'बाप' देखील आहे, यात जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती यांसारख्या कलाकार असणार आहेत. या ॲक्शन चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक चौहान करत आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील जारी केले आहे. यामध्ये चारही स्टार्स दबंग गँगस्टर अवतारात दिसत आहेत.

रामायण : रिपोर्ट्सनुसार, सनी देओल नितीश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात तो हनुमानाची भूमिका साकारताना दिसेल. मात्र, या चित्रपटाच्या कलाकारांबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

गदर 3 : 'गदर 2'च्या यशानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकानं 'गदर 3'बद्दल संकेत दिले होते. अनिल शर्मा यांनी चित्रपटाबाबत सांगितलं होतं की, 'गदर 3'च्या निर्मितीची तयारी सुरू झाली आहे. सध्या चाहते या चित्रपटाच्या अपडेटची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

  1. सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2'मध्ये वरुण धवननंतर दिलजीत दोसांझची झाली एन्ट्री, वाचा सविस्तर - Sunny Deol Border 2
  2. सनी देओल साऊथ डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र, आलिशान कारसह व्हिडिओ केला शेअर - SDGM Shoot
  3. मेघना गुलजारच्या चित्रपटापाठोपाठ आयुष्मान खुराना सनी देओलच्या चित्रपटातून पडला बाहेर - Ayushmann Khurrana

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.