ETV Bharat / entertainment

'हनुमान' चित्रपटानं 25 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवरओलांडला 300 कोटींचा टप्पा - हनुमान चित्रपटाची कमाई

Hanuman box office collection : तेजा सज्जा अभिनीत 'हनुमान'नं 25 दिवसांत 300 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये आता देखील गर्दी होत आहे.

Hanuman box office collection
हनुमान बॉक्स ऑफिस कलेक्शन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 5:35 PM IST

मुंबई - Hanuman box office collection : अभिनेता तेजा सज्जा आणि प्रशांत वर्मा दिग्दर्शित 'हनुमान' अजूनही जगभरात बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. 12 फेब्रुवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पाच साऊथ चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटानं जगभरात 25 दिवसात बॉक्स ऑफिसवर 300 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी चित्रपटाच्या कमाईचे नवे आकडे जाहीर केले आहेत. 'हनुमान' चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. अनेक पालक आपल्या मुलांना हा चित्रपट पाहण्यासाठी नेत आहेत.

300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश : प्रशांत वर्मानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाची 25 दिवसांची कमाईचे आकडे जाहीर करत या पोस्टवर लिहिलं, ''हनुमान'नं 25 दिवसांत 300 कोटींहून अधिक कमाई केली असून या चित्रपटाची कमाई आता देखील प्रचंड वेगानं सुरूच आहे. चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल प्रेक्षकांचे आभार कसे मानावे हेच समजत नाही, चित्रपटाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा मी आभारी आहे.'' देशांतर्गत चित्रपटाचे कलेक्शन 189.83 कोटींवर पोहोचले आहे. हनुमानने पहिल्या आठवड्यात 89.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 60.6 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 29.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर हिंदी व्हर्जनमध्ये या चित्रपटाने 25 दिवसांत 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे.

'या' 5 चित्रपटांना टाकले कमाईच्याबाबतील मागे : 'हनुमान'बरोबर महेश बाबू स्टारर 'गुंटूर कारम', विजय सेतुपती-कतरिना कैफ स्टारर चित्रपट 'मेरी ख्रिसमस', धनुष अभिनीत 'कॅप्टन मिलर', शिवा कार्तिकेयनचा 'अयलान' आणि अरुण विजय स्टारर 'मिशन चॅप्टर 1' हे चित्रपट 12 फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाले होते. या सर्व चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर 'हनुमान'चा प्रभाव अजूनही कायम आहे. फक्त 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या व्हीएफएक्सची प्रशंसा अनेकजण करत आहे, तर दुसरीकडे काहीजण 600 रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर आता देखील चिखलफेक करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'लव्ह अँड वॉर'मध्ये आजवर कधीही न दिसलेल्या अवतारात दिसणार रणबीर कपूर
  2. सुष्मिता सेनने रोहमन शॉलशी जुळवून घेतल्यानंतर लग्नाबद्दल केला खुलासा
  3. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा बेल्जियममध्ये शॉपिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.