कोल्हापूर : राज्यात गेल्या महिनाभरात जीबीएस व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाची संख्या वाढत आहे. विशेषता आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात देखील रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपूर्वीच एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. अशातच आज जिल्ह्यातील रेंदाळ ढोणेवाडी इथं राहणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा जीबीएसमुळं मृत्यू झाल्यानं, हा कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे. तर सीपीआर रुग्णालयात सध्या जीबीएस बाधित पाच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये एकजण व्हेंटिलेटरवर आहे.
जीबीएसचा पहिला मृत्यू : राज्यात जीबीएसबाधित संशयित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आतापर्यंत संशयित रुग्णांची संख्या २०७ वर जाऊन पोहोचली असून यापैकी १८० जणांना जीबीएसची लागण झाल्याचं सिद्ध झालं आहे. यापैकी २० जण हे व्हेटिंलेटर असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली. विशेष म्हणजे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातही 5 रुग्ण आढळून आले असून सर्वावर उपचार सुरू आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी चंदगड तालुक्यातील सोनारवाडी येथील महिलेचा जीबीएसनं मृत्यू झाला. यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याची दखल घेत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
जीबीएस आजाराचे अपडेट? : राज्यातील जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. तर मुंबईतील एका रुग्णालयात एका ५३ वर्षीय पुरुषाचाही जीबीएसमुळं मृत्यू झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मज्जातंतू विकारामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे, असे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितलं होतं.
आजाराची काय आहेत लक्षणं : जीबीएसची लागण झालेल्या रुग्णाच्या लक्षणांमध्ये अतिसार, पोटदुखी, ताप आणि मळमळ किंवा उलट्या यांचा समावेश आहे. दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्यानं जीबीएसचा संसर्ग होऊ शकतो. संसर्गामुळं रुग्णाला अतिसार आणि पोटदुखी होऊ शकते.
हेही वाचा -