ETV Bharat / entertainment

वरुण, क्रिती ते विक्रांत मॅसीपर्यंत बॉलिवूड सेलेब्रिटींनी केले दीपिका-रणवीरचे अभिनंदन - रणवीर सिंग

Deepika Ranveer Announce Pregnancy : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आता आई बाबा होणार आहेत. या स्टार कपलने इन्स्टाग्रामवर त्यांच्या गर्भधारणेची घोषणा केल्यानंतर अनेक सेलेब्रिटी त्यांचे अभिनंदन करत आहेत.

Deepika- Ranveer
दीपिका-रणवीरचे अभिनंदन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 3:49 PM IST

मुंबई - Deepika Ranveer Announce Pregnancy : हिंदी चित्रपटसृष्टीतील जोडपे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी 29 फेब्रुवारी रोजी त्यांच्या सोशल मीडियावर गर्भधारणेची घोषणा केली. त्यांच्या या गुडन्यूजने इंटरनेटला धक्का दिला आणि आपण पहिल्या अपत्याची प्रतीक्षा करत असल्याचे कळवले. यानंतर त्यांचे सहकारी असलेल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी या वर्षी सप्टेंबरमध्ये बोलताना आपल्याला पहिल्या अपत्याची अपेक्षा असल्याचे जाहीर केले होते. आज रणवीर दीपिकाने गुडन्यूज दिल्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये वरुण धवन, क्रिती सॅनन, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, माधुरी दीक्षित, नीना गुप्ता, मसाबा गुप्ता, विक्रांत मॅसी, मीरा राजपूत, नेहा धुपिया, सोनाक्षी सिन्हा अशा सेलेब्रिटींचा यात समावेश होता.

दीपिका पदुकोण आणि रणवीरच्या संयुक्त इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना, क्रिती सेनॉनने लिहिले, "ओह माय गॉड!!!! तुम्हा दोघांचे अभिनंदन!!!" त्याचप्रमाणे वरुण धवनने कमेंट विभागात तीन ब्लॅक हार्ट इमोटिकॉन टाकले. दीपिकाचा 'छपाक' चित्रपटातील सह-कलाकार विक्रांत मॅसीने देखील या जोडप्याचे अभिनंदन केले: "OMGGGGGGG!!!! बहुत बहुत शुभकमनाएं आप दोनो को!!!" असे त्यानं लिहिले.

प्रियंका चोप्राने लिहिले, "मुबारक." सोनम कपूरने कमेंट केली, "अभिनंदन (हार्ट इमोजी)." फॅशन डिझायनर-अभिनेता मसाबा गुप्ता हिने लिहिले, "अभिनंदन (हार्ट इमोजी)... आतापर्यंतची सर्वोत्तम बातमी!" मीरा राजपूतने त्यांच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये रेड हार्ट इमोजी टाकले आहेत.

"अभिनंदन मित्रांनो! आतापर्यंतच्या सर्वोत्तम जगामध्ये आपले स्वागत आहे," असे नेहा धुपियाने प्रतिक्रिया दिली. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि नीना गुप्ता यांनीही कमेंट सेक्शनमध्ये 'अभिनंदन'चा संदेश लिहिला. नवविवाहित रकुल प्रीत सिंगने लिहिले, "ओ माय गॉड अभिनंदन. खूप आनंद झाला."

रणवीर आणि दीपिकाच्या घरी सप्टेंबर महिन्यात नव्या पाहुण्याचे स्वागत होणार आहे. याचा आनंद या दांपत्यासह दोन्ही कुटुंबाना आणि फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या सहकाऱ्यांनाही झाल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन जाणवत आहे.

हेही वाचा -

  1. "हिरामंडी माझा सर्वात मोठा प्रोजेक्ट पाहून मीही झालो आश्चर्यचकित" : संजय लीला भन्साळी
  2. 'प्रेम नाम है मेरा, प्रेम चोप्रा' : स्वतःचंच नाव सांगणाऱ्या खलनायकाच्या प्रभावाची 65 वर्षे
  3. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांनी लग्न विधी सुरू होण्यापूर्वी केली 'अन्न सेवा'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.