ETV Bharat / entertainment

2024 मध्ये सर्वाधिक कमाई केलेले 10 मराठी चित्रपट तुम्हाला माहिती आहेत काय? - HIGHEST GROSSING MARATHI MOVIES

यंदाच्या वर्षात मराठीमध्ये 100 चित्रपटांची निर्मिती झाली. परंतु यातील मोजक्याचं चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं. मराठी सिनेमांची यावर्षातली कमाई किती आहे यावर एक नजर टाकूयात.

HIGHEST GROSSING MARATHI MOVIES
2024 मध्ये सर्वाधिक कमाई केलेले 10 मराठी चित्रपट (Movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 15, 2024, 8:05 AM IST

2024 हे वर्ष संपत असताना मराठीमध्ये तब्बल 100 चित्रपटांची निर्मिती झाली आहे. आशयघन चित्रपटासाठी ओळखल्या जाणाऱ्या मराठी सिनेमानं सर्व प्रकारच्या विषयांना हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये चांगल्या बजेटच्या चित्रपटांपासून ते कलात्मक चित्रपटांचाही समावेश आहे. मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत हा कटू अनुभवही यावर्षी कायम राहिला. बॉक्स ऑफिसचा विचार करता यावर्षी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा सिनेमांनाच यश मिळालं. काही चित्रपटांना थिएटर मिळाले पण प्रेक्षकांनी पाठ फिरवली, तर प्रेक्षकांचा प्रतिसाद असतानाही काही सिनेमांना थिएटर मोकळं करणं भाग पडलं. यामध्ये सर्वाधिक कमाई करणारे मराठीतील 10 चित्रपटांवर एक नजर टाकूयात.

१) नाच गं घुमा

नाच ग घुमा हा २०२४ चा परेश मोकाशी लिखित आणि दिग्दर्शित केलेला आणि हिरण्यगर्भ मनोरंजनच्या बॅनरखाली स्वप्नील जोशी निर्मित चित्रपट होता. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पठारे, मधुगंधा कुलकर्णी, सुनील अभ्यंकर आणि शर्मिष्ठा राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट घरमालक आणि त्यांचा घरी काम करणाऱ्या मोलकरणी यांच्या नात्यावर भाष्य करतो. विनोदी पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचं दिसलं. 1 मे 2024 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं यंदा सर्वाधिक म्हणजे 27 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.

२) नवरा माझा नवसाचा २

सचिन पिळगावकर दिग्दर्शित आणि निर्मित नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट बड्या स्टार कास्ट आणि शीर्षकामुळे चर्चेत राहिला. 2004 मध्ये गाजलेल्या नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वेल आहे. यामध्ये सचिन आणि सुप्रिया पिळगावकर ही पती पत्नीची जोडी आणि हेमल इंगळे आणि स्वप्नील जोशी हे त्यांची मुलगी आणि जावई अशी जोडी आहे. याशिवाय चित्रपटात अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव आणि निर्मिती सावंत यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत. हा चित्रपट 20 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 24 कोटीचा गल्ला जमा करुन यंदा 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा मराठी चित्रपट ठरला.

3) धर्मवीर 2

प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित धर्मवीर हा चित्रपट महाराष्ट्राचं राजकारण तापवणारा चित्रपट ठरला. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर चित्रपटाचा सीक्वेल होता. झी स्टुडिओ आणि साहिल मोशन आर्ट्सच्या बॅनरखाली उमेश बन्सल आणि मंगेश देसाई यांनी याची निर्मिती केली आहे.या चित्रपटात प्रसाद ओक आणि क्षितीश दाते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. धर्मवीर 2 चित्रपटानं 15.5 कोटी रुपयांचा व्यवसाय करत आपलं स्थान अबाधित राखलं.

4) जुनं फर्निचर

महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित जुनं फर्निचर यंदा आशयपूर्ण चित्रपटा्ंच्या यादीत वरचढ ठरला. महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. यामध्ये महेश मांजरेकर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या चित्रपटात मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, सचिन खेडेकर आणि उपेंद्र लिमये यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यतीन जाधव यांनी स्कायलिंक एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली याची निर्मिती असलेल्या जुनं फर्निचर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 14 कोटी इतकी समाधानकारक कमाई केली.

5) शिवरायांचा छावा

दिग्पाल लांजेकर लिखित आणि दिग्दर्शित आणि मल्हार पिक्चर कंपनी निर्मित शिवरायांचा छावा हा मराठीतील ऐतिहासिक विषयावरील चित्रपट प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन करणारा ठरला. श्री शिवराज अष्टकमधील सहाव्या चित्रपटामध्ये भूषण पाटील, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, आयेशा मधुकर, समीर धर्माधिकारी आणि राहुल देव यांच्या भूमिका आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा माडण्यात आली आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 11 कोटी जमा करता आले.

6) ओले आले

नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि मकरंद अनासपुरे अशी तगडी स्टार कास्ट असलेला ओले आले हा चित्रपट लक्ष वेधणारा ठरला. खूप दिवसानंतर नाना मराठीत काम करत असल्यामुळे नानाप्रेमींनी थिएटरमध्ये उत्साहत प्रवेश केला. रश्मिन मजिठिया निर्मित आणि विपुल मेहता लिखित आणि दिग्दर्शित ओले आले या चित्रपटाची गाणीही गाजली. 5 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं 12 एप्रिल 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर त्याचे 100 दिवस पूर्ण केले आणि 5.33 कोटींची कमाई केली.

7) धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज: भाग 1

एकाच वर्षी मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांच्यावर दोन चित्रपट रिलीज झाले. एक होता दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा आणि दुसरा होता तुषार शेलार दिग्दर्शित धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज: भाग 1. शेखर मोहितेपाटील आणि सौजनराम यांनी निर्मिती केलेल्या या ऐतिहासिक विषयावरील चित्रपटात अमृता खानविलकर, प्रदीप रावत, संजय खापरे, भार्गवी चिरमुले, कमलेश सावंत, किशोरी शहाणे आणि राज जुत्शी यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत ठाकूर अनूप सिंग यांनी काम केलं आहे. 22 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर 8. 23 कोटी कमवता आले.

8 ) फुलवंती

प्राजक्ता माळीची मुख्य भूमिका असलेला फुलवंती हा यंदा रिलीज झालेला आणखी एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी केलं आहे. हा चित्रपट बाबासाहेब पुरंदरे यांच्या फुलवंती या मराठी कादंबरीवर आधारित आहे. पेशवेकालीन नृत्यांगना फुलवंती आणि प्रसिद्ध पेशवे पंडित विद्वान व्यंकट शास्त्री यांची कथा यात पाहायला मिळते. 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं 6.45 कोटींची कमाई केली आहे.

9 ) छत्रपती संभाजी

छत्रपती संभाजी यांच्यावर आधारित रिलीज झालेल्या ऐतिहासिक चित्रपटांपैकी हा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश सुबेसिंग दुलगज यांनी केलं. शशांक उदापूरकर आणि प्रमोद पवार, रजित कपूर, मृणाल कुलकर्णी यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या निर्मितीला नऊ वर्षाचा कालावधी लागल्याचं सांगितलं जात. अनेक अडथळे पार करत हा सिनेमा 2 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कमाई 5.45 कोटी इतकी झाली.

10 ) अल्याड पल्याड

अल्याड पल्याड हा 2024 मध्ये रिलीज झालेला एक हॉरर कॉमेडी चित्रपट होता. एसके पाटील दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती SMP प्रॉडक्शननं केली होती. या चित्रपटात मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर, सुरेश विश्वकर्मा आणि चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 4.43 कोटी कमवले आणि हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठीतील दहावा चित्रपट ठरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.