ETV Bharat / entertainment

दिलजीत दोसांझनं प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये गायलं गाणं, प्रोमो रिलीज - Kalki 2898 AD First Song Promo out - KALKI 2898 AD FIRST SONG PROMO OUT

Kalki 2898 AD First Song Promo out : पंजाबी गायक दिलजीत दोसांझनं प्रभास अभिनीत 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात गाणं गायलं आहे. या गाण्याचा प्रोमो आज रिलीज करण्यात आला आहे.

Kalki 2898 AD First Song Promo out
कल्की 2898 एडी पहिलं गाणं प्रोमो रिलीज ('कल्कि 2898 एडी' सॉन्ग प्रोमो (IMAGE- ETV BHARAT))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 5:56 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD First Song Promo out : प्रभास स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'कल्की 2898 एडी'चं पहिलं गाणं भैरव थीमवर आहे. आता या गाण्याचा प्रोमो आज 15 जून रोजी रिलीज झाला आहे. हे गाणे पंजाबी स्टार दिलजीत दोसांझनं गायलं आहे. 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट 600 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपचाकडून अनेकांना खूप अपेक्षा आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहेत. या गाण्याचे पोस्टर 14 जून रोजी शेअर करण्यात आले होते. या पोस्टमध्ये प्रभास दिलजीतबरोबर दिसत होता. या गाण्याला संगीतकार संतोष नारायण यांनी संगीत दिलं आहे.

'कल्की 2898 एडी'मधील पहिल्या गाण्याचा प्रोमो रिलीज : दरम्यान शेअर केलेला गाण्याचा प्रोमो हा खूप दमदार आहे. या प्रोमोमध्ये पंजाबीमध्ये दिलजीत बोल गात आहे. 'कल्की 2898 एडी' हा नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात अनेक सुपरस्टार दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास व्यतिरिक्त , दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेतस असणार आहेत. याशिवाय या चित्रपटात साऊथचा सुपरस्टार कमल हासन खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. नुकताच 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर रिलीज झाला होता .याशिवाय सर्व स्टार कास्टचा फर्स्ट लूक समोर आला आहे. नाग अश्विन बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटावर काम करत आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाची रिलीज डेट अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली होती.

'कल्की 2898 एडी' 'या' दिवशी होणार रिलीज : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. आता रिलीजपूर्वी दिलजीत दोसांझच्या आवाजातील हे गाणे रिलीज होण्याचीही वाट चाहते पाहात आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास हा भैरवच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी अमिताभ बच्चन ट्रेलरमध्ये अश्वत्माच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामधील त्याची ही भूमिका वेगळी असून त्याचे चाहते, या चित्रपटामध्ये त्यांना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. प्रोजेक्ट 'के' बद्दल बोलायचं झालं तर, (काली) कमल हसनचं राज्य संपवण्यासाठी (सुमती) दीपिका पदुकोण कल्किला जन्म देणार असल्याचं या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे.

हेही वाचा :

  1. शरद पवारांनी माझं चुटकीसरशी केलं काम, अशोक सराफांनी सांगितली 'खास' आठवण... - ashok saraf
  2. क्राईम थ्रिलर वेब सीरीज 'मिर्झापूर सीझन 3'च्या ट्रेलर रिलीजची तारीख आली समोर - MIRZAPUR SEASON 3 TRAILER
  3. रवीना टंडन विरोधात तक्रार दाखल; तर फेक रोड रेज व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याला रवीनानं बजावली नोटीस - raveena tandon

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.