ETV Bharat / entertainment

मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्रला बसला धक्का - ईशा देओलचा घटस्फोट

Dharmendra : मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्रला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे याप्रकरणी हेमा मालिनी आपल्या मुलीला पाठिंबा देत आहेत.

Dharmendra
धर्मेंद्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 11:59 AM IST

मुंबई - Dharmendra : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांना मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटामुळे मोठा धक्का बसला आहे. ईशानं अलीकडेच भरत तख्तानीला घटस्फोट दिला आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशा आणि भरतचं नात तुटल्यामुळे धर्मेंद्र अत्यंत दु:खी आहेत, तर दुसरीकडे अभिनेत्री हेमा मालिनी यांना आपल्या मुलीचा निर्णय योग्य असल्याचं वाटत आहे. अलीकडेच ईशा आणि भरत यांनी सोशल मीडियावर एकमताने आणि संयुक्तपणे घटस्फोटाची घोषणा केली. आता मुलगी घरी बसल्यामुळे धर्मेंद्र यांचे मन आतून तुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देओल कुटुंबाच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की, ''मुलगी ईशाच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्रला धक्का बसला आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीचे घर मोडू नये असं वाटत आहे.''

ईशा देओलच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र यांना बसला धक्का : धर्मेंद्रनं मुलगी ईशाला तिच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी समजावले आहे. धर्मेंद्रला आपल्या मुलीचा घटस्फोट पचवता येत नसल्यानं त्यांनी जावई भरतलाही खूप समजावून सांगितले आहे, पण दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. एकीकडे आपल्या मुलीच्या घटस्फोटामुळे धर्मेंद्र पूर्णपणे दु:खी झाले आहेत, तर दुसरीकडे हेमा मालिनी यांच्यावर या गोष्टीचा काहीही परिणाम झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार हेमा मालिनी आपल्या मुलीच्या घटस्फोटाच्या बाजूने आहेत. या प्रकरणी त्या आपल्या मुलीला पूर्ण पाठिंबा देत आहे.

ईशा देओल आणि भरत तख्तानीचं लग्न : ईशा आणि भरतनं जून 2012 मध्ये मुंबईच्या इस्कॉन मंदिरात विवाह केला होता. लग्नाच्या पाच वर्षानंतर, हे जोडपे एका मुलीचे ( राध्या) आई-वडील झाले. यानंतर ईशानं 2019 मध्ये दुसऱ्या मुलीला (मिराया) जन्म दिला. दरम्यान 2023 मध्ये ईशा देओलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये भरत गायब होता. यानंतर 17 जानेवारी रोजी एक यूजरच्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ''ईशा आणि भरत एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे ते आता सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाहीत. भरत त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. याशिवाय तो बंगळुरूमध्ये नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एका पार्टीत एका मैत्रिणीबरोबर दिसला असल्याचं सांगण्यात आलं होत.''

हेही वाचा :

  1. वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी रवीना टंडन झाली भावूक
  2. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
  3. वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी रवीना टंडन झाली भावूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.