ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणच्या पहिल्या मॅटर्निटी फोटोशूटला 24 तासाच्या आत मिळाले 50 लाखांहून जास्त लाईक्स - DEEPIKA PADUKONE - DEEPIKA PADUKONE

Deepika Padukone : दीपिका पदुकोणचं पहिलं मॅटर्निटी फोटोशूट सध्या चर्चेत आहे. मॅटर्निटी फोटोशूटमधील फोटो व्हायरल होऊन 24 तास होण्यापूर्वीच त्याला 5 मिलियनहून अधिक म्हणजेच 50 लाखांहून जास्त लाईक्स मिळाले आहेत.

Deepika Padukone
दीपिका पदुकोण (दीपिका पदुकोण (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 3:05 PM IST

मुंबई - Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं तिचा पहिला हॉट आणि बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केला. यानंतर तिनं सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दीपिका पदुकोणच्या मॅटर्निटी फोटोशूटला लाईक्सचा पूर आला आहे. दीपिकाच्या मॅटर्निटी फोटोशूटला आतापर्यंत 5 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये पती रणवीर सिंगचाही समावेश आहे. आता या कपलचा फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान दीपिका याच महिन्यात आई होणार आहे.

मॅटर्निटी फोटोशूटसाठी मिळाले जास्त लाईक्स : मॅटर्निटी फोटो शेअर करून 'दीपवीर'नं त्याच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, अभिनेत्री आलिया भट्टच्या पहिल्या मॅटर्निटी फोटोशूटला देखील खूप लाइक्स मिळाले आहेत. आलियाच्या प्रेग्नेंसी पोस्टला 5 मिलियनहून पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. दीपिका पदुकोणच्या मॅटर्निटी फोटोशूटला 24 तासही उलटले नाहीत आणि 5 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नुकतीच रिचा चढ्ढानं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, नेहा धूपिया, सोनम कपूर आणि काजल अग्रवाल यांनीही त्यांच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो चाहत्यांमध्ये शेअर केले होते. हे फोटो देखील चाहत्यांना खूप आवडले होते.

दीपिका पदुकोणच्या डिलिव्हरीबद्दलची अफवा : दरम्यान अलीकडेच अशी अफवा पसरली होती की दीपिका पदुकोण 28 सप्टेंबरला आई होणार आहे. याच दिवशी दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरचा वाढदिवस आहे. त्यामुळे 28 सप्टेंबरला दीपिका आपल्या पहिल्या मुलाला जन्म देणार, असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दीपिका आणि रणवीरनं गेल्या फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं की, ते सप्टेंबरमध्ये आई-वडील होणार आहेत. 'दीपवीर'नं 2018 मध्ये पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं होतं. आता लग्नाच्या 6 वर्षानंतर हे जोडपं त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागताच्या तयारीत आहे. दरम्यान दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगण आणि करीना कपूर खानबरोबर दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट आली समोर, कधी होणार आई जाणून घ्या... - RANVEER SINGH and Deepika Padukone
  2. दीपिका पदुकोणचं नातेवाईकांबरोबर डिनर गेट टूगेदर, बॅटमिंटनपट्टू लक्ष्य सेनबरोबर झाली स्पॉट - Deepika Padukone
  3. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.