ETV Bharat / entertainment

आदर्श जोडीदार कशी हवी? कार्तिक आर्यननं 'ही' व्यक्त केली अपेक्षा - Kartik Aaryan - KARTIK AARYAN

Kartik Aaryan Life Partner:'चंदू चॅम्पियन' स्टार कार्तिक आर्यननं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळ्यापणानं एका मुलाखतीत सांगितलं आहे. यावेळी त्यानं त्याच्या आदर्श जोडीदारबद्दल खुलासा केला आहे.

Kartik Aaryan Life Partner
कार्तिक आर्यनचा लाइफ पार्टनर (कार्तिक आर्यन (ANI Photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 10:55 AM IST

मुंबई - Kartik Aaryan Life Partner : अभिनेता कार्तिक आर्यन 2024 मध्ये त्याच्या आगामी स्पोर्ट्स ड्रामा 'चंदू चॅम्पियन'च्या रिलीजसाठी सज्ज आहे. तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी जाताना दिसत आहे. अलीकडेच प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत त्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. कार्तिकनं आइडियल लाइफ पार्टनरबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहेत. कार्तिक त्याच्या लव्ह लाईफमुळे अनेकदा चर्चेत असतो. रिपोर्ट्सनुसार, 'लव्ह आज कल'च्या शूटिंगदरम्यान त्यानं सारा अली खानला डेट केलं होतं. त्याचं आणि साराचं नात फार काळ टिकू शकले नाही. ब्रेकअप झाल्यानंतर तो अनन्या पांडेबरोबर काही काळ असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या.

फ्रीक्वेंसी मॅच झाली पाहिजे : एका यूट्यूब मुलाखतीत कार्तिकला आइडियल लाइफ पार्टनरबद्दल विचारण्यात आलं. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यानं म्हटलं, हे आपोआप होईल. दोघांमधील फ्रीक्वेंसी मॅच झाली पाहिजे. ती मजेदार असावी. एखादी वेळा तुम्ही कोणाला भेटता आणि कनेक्ट होता. माझ्या पार्टनरनं मला समजून घेतले पाहिजे. तिनं माझा आदर केला पाहिजे. तुम्हाला आयुष्यात हेच हवे असते. माझ्याप्रमाणेच तिला देखील कामाची आवड असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात परफेक्शन शोधता, तेव्हा तसे काही मिळतत नाही. प्रत्येकांमध्ये काही तरी कमतरता असते. त्याचं गोष्टी आयुष्य सुंदर बनवत असतात. आयुष्यातील जोडीदाराच्या बाबतीत, माझ्याकडे सध्या काही विशिष्ट कल्पना नाही."

'चंदू चॅम्पियन' चित्रपटाबद्दल : कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' हा भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व्यतिरिक्त भुवन अरोरा, यशपाल शर्मा, राजपाल यादव, भाग्यश्री बोरसे, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ आणि इतर अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट 14 जून 2024 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. हा चित्रपट बनविण्यासाठी 140 कोटी रुपये खर्च झाल्याची चर्चा आहे. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'भूल भुलैया 3' या चित्रपटामध्ये विद्या बालनबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा 2 द रुल'मध्ये मोठा बदल, महत्त्वाच्या व्यक्तीनं सोडली दिग्दर्शकाची साथ - Pushpa 2 The Rule
  2. दीपिका पदुकोणचा बेबी बंप पाहून चाहते म्हणतात, 'हिच्या पोटी जन्म घेणार कल्की!' - deepika padukone
  3. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'त्रिदेव' फेम सोनम खान करणार प्रवेश - Vishwatma Fame Sonam Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.