मुंबई - Cannes 2024 : यंदाच्या प्रतिष्ठीत कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रेक्षकांना इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (FTII) च्या प्रतिभावान माजी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' आणि मैसम अलीच्या 'इन रिट्रीट'ने या आधीच लहरी निर्माण केल्या आहेत आणि आता 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या चार FTII विद्यार्थ्यांचा लघुपटाला 'ला सिनेफ' स्पर्धात्मक विभागातrn लाइनअपमध्ये सामील झाला आहे. प्रतिष्ठित फिल्म फेस्टीव्हलमध्ये FTII माजी विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहेत हे पाहणं खूप रोमांचक असणार आहे.
या वर्षी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या फिल्म इन्स्टीट्यूटच्या दिग्दर्शन अभ्यासक्रमातील एक नव्हे तर तीन प्रतिभावान माजी विद्यार्थ्यांचे काम पाहायला मिळणार आहे. त्यांच्या निर्मितीपैकी एक असलेल्या 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो' या चार FTII विद्यार्थ्यांनी एक लघुपट 'ला सिनेफ' स्पर्धात्मक विभागात झळकणार आहे. चिदानंद एस नाईक दिग्दर्शित हा लघुपट कान्स 2024 मध्ये ला सिनेफ विभागातील स्पर्धेत बक्षिसांसाठी इतर 17 शॉर्ट्सशी स्पर्धा करेल.
या चित्रपटात एका वृद्ध महिलेची कथा आहे जी कोंबडा चोरून आपल्या गावात एक संकट ओढवून घेते आणि तिच्या कुटुंबाला वनवासाला जाण्यास भाग पाडते. कान्स फिल्म फेस्टीव्हलची खडतर स्पर्धा लक्षात घेता FTII विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा पराक्रम आहे. जगभरातील फिल्म इन्स्टीट्यूटमधून 2,000 हून अधिक प्रवेशिका सबमिट केल्या गेल्या होत्या.
FTII ला या लघुपटाच्या कान्समधील निवडीबद्दल सार्थ अभिमान वाटला असून त्यांनी ही बातमी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि चित्रपटामागील हुशार विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलंय. हा प्रकल्प संस्थेच्या टीव्ही विंगच्या एक वर्षाच्या कार्यक्रमाचा भाग होता. यामध्ये विविध विषयांतील विद्यार्थी एकाच प्रकल्पासाठी सहयोग करत होते. 'सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन टू नो' या लघुपटाशिवाय जगभरातील इतर प्रभावी लघुपट 'ला सिनेफ' विभागात निवडण्यात येतील.
कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील प्रतिष्ठित पाल्मे डी’ओर स्पर्धेसाठी पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट'ने प्रवेश केल्याने भारतासाठी ही अभिमानाची बाब होती. याशिवाय एसीआयडी कान्स साइडबार प्रोग्राममध्ये मैसम अलीच्या 'इन रिट्रीट'सह एफटीआयआयचे आणखी प्रतिनिधित्व पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, संध्या सुरी दिग्दर्शित 'संतोष' चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या 'अन सर्टन रिगार्ड' विभागासाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे मीता वशिष्ठ स्टारर शेमलेस, बल्गेरियन दिग्दर्शक कोन्स्टँटिन बोजानोव यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देखील 'अन सर्टन रिगार्ड' विभागात दाखवला जाईल.
हेही वाचा -
वरुण धवननं कुटुंबाबरोबर शेअर केला 37वा वाढदिवस, फोटो व्हायरल... - varun dhawan