मुंबई - साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची भूमिका असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा - द रुल'चा दुसरा भाग चालू वर्षात प्रदर्शित होणार आहे. याची रिलीज डेट खूप आधी जाहीर झाली असून आता अल्लू अर्जुनचे चाहते चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा करत आहेत. 'पुष्पा - द राइज' (पहिला भाग) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, त्यामुळे 'पुष्पा 2' मध्ये नेमका कोणता धमाका करणार, त्यानंतर या चित्रपटाची पुढची कथा काय असेल, याची उत्कंठा चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. अशातच आता होण्यापूर्वीच 'पुष्पा 3'ची चर्चा ऐकू येत आहे.
'पुष्पा 3' ची गर्जना - 'पुष्पा' चित्रपटाचा तिसरा भाग 'पुष्पा 3' ही बनणार असल्याचे बोलले जात आहे. 'पुष्पा 2' रिलीज झाल्यानंतर 'पुष्पा 3' ची घोषणा केली जाऊ शकते. जर 'पुष्पा 2' ने पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली तर चाहत्यांना 'पुष्पा 3' ची भेट मिळू शकते. आता 'पुष्पा 3' ची बातमी सोशल मीडियावर खूप वेगाने पसरली आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी या चित्रपटाचे नावही ठेवले आहे. अशातच 'पुष्पा 3' देखील चित्रपटाचा शेवटचा भाग नसल्याचं बोललं जात आहे. निर्माते पुष्पा फ्रँचायझी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
'पुष्पा 3' चे शीर्षक काय असेल? - मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पुष्पा 3' चित्रपटाचे नाव 'पुष्पा - द रोअर' असल्याचे बोलले जात आहे. मात्र 'पुष्पा'च्या निर्मात्यांनी अद्याप या वृत्तांना दुजोरा दिलेला नाही. या परिस्थितीत आता चाहत्यांनाही 'पुष्पा 3' चित्रपटाचे लेटेस्ट अपडेट लवकरात लवकर देण्याची निर्मात्यांकडून अपेक्षा आहे. 'पुष्पा 2' म्हणजेच 'पुष्पा-द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना ही हिट जोडी पुन्हा एकदा चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा २’ चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अजून वरच्या स्तरावर नेण्याच्या तयारीत व्यस्त आहेत.
हेही वाचा -