ETV Bharat / entertainment

अनंत अंबानीच्या लग्नात बाबा रामदेव थिरकले, डान्स व्हिडिओ व्हायरल - Baba Ramdev Dance Video Viral - BABA RAMDEV DANCE VIDEO VIRAL

Baba Ramdev Dance Video Viral : योगगुरू बाबा रामदेव यांनी अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी लावली होती. लग्नाच्या मिरवणुकीत अनंतबरोबर रामदेव बाबानं जोरदार डान्स केला. आता अनंतच्या लग्नाच्या वरातीतील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Baba Ramdev Dance Video Viral
बाबा रामदेव डान्स व्हिडिओ व्हायरल ((IMAGE- ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 4:10 PM IST

मुंबई Anant Ambani wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं 12 जुलैला बहुचर्चित लग्न पार पडलं. जिओसह अनेक कंपन्यांचे मालक असलेल्या मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नासाठी जगभरातील सेलिब्रिटींना एका छताखाली आणलं होतं. या लग्नाला राजकारण, व्यवसाय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. आता लग्नामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, एका व्हिडिओमध्ये पतंजलीचे मालक बाबा रामदेव लग्नाच्या मिरवणुकीत वर अनंत अंबानीबरोबर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल झाला आहे.

अनंत अंबानी आणि बाबा रामदेवचा व्हिडिओ व्हायरल : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये बाबा रामदेव त्यांच्या वेशभूषेत पोहोचले होते. रामदेव बाबाबरोबर त्यांचे बिझनेस पार्टनर बाळकृष्ण हे देखील सहभागी झाले होते. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनंत हा बाबा रामदेव यांचा हात धरून नाचताना दिसत आहे. व्हिडिओवर यूजर्स खूप मजेशीर कमेंट्स करत असल्याचं दिसत आहेत. या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं, "हा अनंत सर्वांचे हात तोडणार आहे." आणखी एका यूजरनं लिहिलं, " या लग्नात 'एलन मस्क' नाही आला का ?" आणखी एकानं लिहिलं, बाबा रामदेव वर्सेस अनंत अंबानी." अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर केल्या गेल्या आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न : अनंत अंबानीनं त्यांची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्न केलंय. राधिका मर्चंट ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची एकुलती एक मुलगी आहे. अनंत आणि राधिका एकाच शाळेत शिकले आहेत. राधिका आणि अनंत बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान मुलाच्या लग्नावर शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये त्यांनी देशी-विदेशी पाहुण्यांना आणण्यासाठी शेकडो विमाने बुक केली होती. या सर्व पाहुण्यांना आरामासाठी अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामाची सोय केली होती.

हेही वाचा :

  1. अनंत अंबानीच्या लग्नात नाचून प्रियांका चोप्रा खूश, म्हणाली, "सासरी हे सर्व मिस करते" - Priyanka Chopra
  2. अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ आणि जया बच्चनच्या पाया पडला शाहरुख खान - Anant Radhika Wedding
  3. अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या रायनं बच्चन कुटुंबासह येणं टाळलं, पुन्हा नव्या अटकळांना चालना - Aishwarya Rai Bachchan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.