मुंबई -Auron Mein Kahan Dum Tha Trailer : बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणनं 'शैतान' या हॉरर चित्रपटातून धमाका केल्यानंतर, आता त्याचा 'ओरों में कहाँ दम था' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये एक प्रेमकहाणी दाखवण्यात येणार आहे. दरम्यान 'ओरों में कहाँ दम था'चा ट्रेलर आज 13 जून रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगणबरोबर त्याची बेस्ट फ्रेंड तब्बू दिसणार आहे. यापूर्वी 31 मे रोजी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. या टीझरमध्ये अजय आणि तब्बूबद्दलचे काही प्रेमळ क्षण दाखवण्यात आले होते.
'ओरों में कहाँ दम था' ट्रेलर रिलीज : 'ओरों में कहाँ दम था' चित्रपटाचं दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलं आहे. याआधी त्यांनी 'स्पेशल ऑप्स', 'एम.एस. धोनी अनटोल्ड स्टोरी', 'बेबी', 'स्पेशल 26', 'अय्यारी' आणि 'अ वेनस्डे' यासारख्या दमदार चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. आता ते 'ओरों में कहाँ दम था' या चित्रपटातून प्रेमकहाणी घेऊन येत आहे. 'ओरों में कहाँ दम था' हा चित्रपट बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि तब्बूशिवाय जिमी शेरगिल, सई मांजरेकर आणि शंतनू माहेश्वरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हेरवत, कुमार मंगत पाठक, संगीता अहिर, शीतल भाटिया यांनी केली आहे.
वर्कफ्रंट : 'ओरों में कहाँ दम था' हा चित्रपट एनएच आणि पॅनोरमा स्टुडिओद्वारे बनविण्यात आला आहे. हा चित्रपट 5 जुलै 2025 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अजय आणि तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोणबरोबर दिसणार आहे. याशिवाय त्याचा 'रेड 2', 'दे दे प्यार दे 2' आणि 'गोलमाल 5 ' हे चित्रपट येणार आहेत. दुसरीकडे तब्बूबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'क्रू' चित्रपटामध्ये दिसली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर क्रिती सेनॉन आणि करीना कपूर खान या मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या.
हेही वाचा :