ETV Bharat / entertainment

भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा झाली संतप्त, व्हिडिओ व्हायरल - Anushka Sharma - ANUSHKA SHARMA

Anushka Sharma Viral Video : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती आक्रमक होताना दिसत आहे.

Anushka Sharma Viral Video
अनुष्का शर्माचा व्हायरल व्हिडिओ (अनुष्का शर्मा (IMAGE - IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 1:22 PM IST

मुंबई - Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या क्रिकेटर पती विराट कोहलीबरोबर आयसीसी टी 20 (ICC T20) वर्ल्ड कप टूरवर आहे. टीम इंडियाच्या प्रत्येक मॅचमध्ये अनुष्का स्टेडियममधून भारतीय संघाला चिअर करत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्यातही अनुष्का शर्मा दिसली होती. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी न्यूयॉर्क स्टेडियमवर झाला होता. आता या सामन्यादरम्यानचे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा खूपच चिडलेली दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्का एका व्यक्तीबरोबर बोलताना दिसत आहे.

अनुष्का शर्मा झाली संतप्त : बोलताना व्हिडिओत अनुष्का आपला संयम गमावताना दिसत आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, याबद्दल खुलासा झालेला नाही. या व्हायरल व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनुष्का शर्माच्या या संतप्त व्हिडिओवर यूजर्सच्या कमेंट्सचा भडका उडाला आहे. एका यूजरनं लिहिलं, "विराटनं अनुष्काला आपल्यासारखे बनवले आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "अनुष्का जशी दिसते तशी नाही आहे." आणखी एकानं लिहिलं, "वहिनीला राग येतोय." यानंतर एका चाहत्यानं समर्थनार्थ लिहिलं, "माणसाला, राग आणि हशा या दोन्ही भावनाअसतात."

अनुष्का शर्माचं वर्कफ्रंट : या रोमांचक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला होता आणि शेवटच्या सामन्यात यूएसए (USA )संघाचा 7 विकेटनं पराभव करून टीम इंडियानं आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 च्या सुपर 8 मध्ये स्थान मिळवले आहे. आता भारताचा पुढील सामना 15 जूनपासून कॅनडाविरुद्ध होणार आहे. दरम्यान अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'कनेडा' या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये अनुष्का झुलन गोस्वामीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रोसित रॉय करत आहे. हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे, मात्र या चित्रपटाबद्दल कुठलेही अपडेट आलेली नाही.

हेही वाचा :

  1. 'बॉर्डर 2'ची घोषणा, 27 वर्षांनंतर सनी देओल त्याच्या 'जवानां'सह परतणार - Sunny Deol to
  2. करण ओबेरॉयनं मोना सिंगबरोबरच्या ब्रेकअपबद्दल 18 वर्षांनी केला खुलासा - Karan Oberoi
  3. विजय वर्माने सुरू केले 'मटका किंग'चे शूटिंग, नागराज मंजुळे करतोय दिग्दर्शन - Matka King

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.