ETV Bharat / entertainment

मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल अनुष्का-विराटनं गिफ्ट पाठवून मानले पापाराझीचे आभार - anushka sharma - ANUSHKA SHARMA

Anushka Sharma and Virat Kohli : अकायच्या जन्मानंतर गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनं गिफ्ट पाठवून पापाराझीचं आभार मानलं आहे. आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिफ्टची झलक दिसत आहे.

Anushka Sharma and Virat Kohli
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (अनुष्का शर्मा और विराट कोहली का फाइल फोटो(@anushkasharma Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 14, 2024, 2:16 PM IST

मुंबई - Anushka Sharma and Virat Kohli : अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली आपल्या मुलांच्या गोपनीयतेबाबत खूप लक्ष देतात. अलीकडेच या जोडप्यानं त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केलं. या दोघांनी आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं आहे. गरोदरपणात या जोडप्यानं मीडिया आणि पापाराझीला गोपनीयता ठेवण्याचे आवाहन केलं होतं. मीडिया आणि पापाराझीच्या या विशेष सहकार्यासाठी या जोडप्यानं धन्यवाद मानणाऱ्या चिठ्ठीसह एक मोठे गिफ्ट पॅकेट पाठवले आहे. आता याची झलक सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. एका पापाराझीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अनुष्का आणि विराट यांच्याकडून मिळालेल्या धन्यवाद गिफ्टची झलक दाखवली आहे.

अनुष्का आणि विराटानं पापाराझीचं मानलं आभार : अनुष्का आणि विराटनं दिलेल्या गिफ्टमध्ये बऱ्याच आयटमसह एक धन्यवाद नोट देखील दिसत आहे. क्लिपची सुरुवात आभारानं होते. या चिठ्ठीत लिहिले आहे, "आमच्या मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि नेहमी सहकार्य राखल्याबद्दल धन्यवाद. लव्ह अनुष्का आणि विराट." या गिफ्टमध्ये एका बॅगसह काही गॅझेट्स आणि एक बाटली आहे. या भेटवस्तूबद्दल पापाराझीनं या जोडप्याचं आभार मानलं आहेत. दरम्यान अकायचा जन्म हा लंडनमध्ये झाला होता. यानंतर अनुष्का बरेच दिवस लंडनमध्येच थांबली होती. अकायच्या जन्माची बातमी अनुष्का आणि विराटनं सोशल मीडियाद्वारे दिली होती.

वर्कफ्रंट : अकायच्या जन्मानंतर, 12 मे रोजी, अनुष्का शर्मा पहिल्यांदाच स्टेडियममध्ये विराट कोहली आणि त्याच्या टीमला चिअर अप करताना स्पॉट झाली होती. स्टेडियममधील कपलचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 47 धावांनी पराभव केला होता. दरम्यान, अनुष्का ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा आपल्या पतीबरोबरचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते. दरम्यान, अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'परी' या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. आता ती आगामी 'चकडा एक्सप्रेस'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. बिपाशा बसूनं प्रसूतीनंतर मुलगी देवीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, पाहा झलक - Bipasha Basu
  2. सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी सहाव्या आरोपीला केली अटक - salman khan
  3. राखी सावंत टॉवेल आउटफिटमध्ये कार्यक्रमात झाली सहभागी, युजर्सला आली मेट गालाची आठवण - RAKHI SAWANT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.