ETV Bharat / entertainment

'भूल भुलैया 3'च्या दिग्दर्शकाबरोबर अजय देवगणच्या 'नाम'ची घोषणा, 'सिंघम अगेन' नंतर रिलीज होणार सिनेमा - AJAY DEVGAN NAAM

Ajay Devgan Naam Announcement : 'भूल भुलैया 3' चे दिग्दर्शक अनीस बज्मीच्या आगामी अजय देवगणबरोबरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

Ajay Devgan Naam Announcement
अजय देवगणच्या 'नाम'ची घोषणा ((ANI/Film Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 26, 2024, 5:27 PM IST

मुंबई - अभिनेता अजय देवगणचा 'नाम' हा सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 22 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 'भूल भुलैया'चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी याचे दिग्दर्शन केलं आहे. 'हलचल', 'प्यार तो होना ही था' आणि 'दिवानगी' नंतर अजयबरोबर अनीस बज्मीचा हा चौथा चित्रपट असेल. 'नाम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या पोस्टरसह ही घोषणा केली. यापूर्वी असं मानलं जात होतं की हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होईल. परंतु अनेक वेळा पुढे रिलीज लांबणीवर पडल्यानंतर हा चित्रपट आता 22 नोव्हेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे.

स्वित्झर्लंडमध्ये झालंय 'नाम'चं शूटिंग

मिळालेल्या माहितीनुसार, 'नाम' हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात एक स्मृती गमावेला व्यक्ती आपण कोण आहोत हे शोधण्यासाठी प्रवासाला निघतो, असं याचं कथानक आहे. स्वित्झर्लंड आणि मुंबईमध्ये या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे. कथा प्रधान चित्रपटाला प्रेक्षकांची नेहमी साथ मिळते असा अनुभव आहे. अजय देवगणला जेव्हा उत्तम कथा मिळते तेव्हा त्यातील व्यक्तीरेखेचं तो सोनं करतो हाही आजवरचा अनुभव आहे. त्यामुळं यशस्वी दिग्दर्शक अनीस बज्मी आणि अजय देवगण पुन्हा एकत्र येणार असल्यामुळं 'नाम'बद्दलची उत्कंठा वाढली आहे.

या चित्रपटात आधी प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत होती, पण तिनं माघार घेतली आणि तिची जागा समीरा रेड्डी हिनं घेतली आहे. भूमिका चावलाचेही या कलाकारांच्या यादीत नाव आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल रुंगटा यांनी केली आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिलंय, "अजय देवगण आणि अनीस बज्मी या जोडीचा 'नाम' 22 नोव्हेंबरला रिलीज होणार, घोषणा पोस्टर लाँच."

दरम्यान, अनीस बज्मीचा 'भूल भुलैया 3' हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, विद्या बालन आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या मल्टीस्टारर चित्रपट 'सिंघम अगेन'शी टक्कर देणार आहे. यामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ यांसारख्या दिग्गज कलाकारांची मोठी टीम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.