ETV Bharat / entertainment

पर्यावरणपूरक सण साजरा करूया, अमृता फडणवीस यांचं आवाहन - Amruta fadnavis - AMRUTA FADNAVIS

Amruta fadnavis : 'दिव्याज फाउंडेशन'च्या वतीनं मुंबईत पालिका शाळेतील 2000 विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मुर्तींची निर्मिती केली. यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अमृता फडणवीस, सलमान खान, सोनू निगम, सोनाली बेंद्रे, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे नामवंत उपस्थित होते.

Amruta fadnavis
अमृता फडणवीस (reporter)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 29, 2024, 2:22 PM IST

मुंबई - Amruta fadnavis : सुप्रसिद्ध गायिका, बॅंकर आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या 'दिव्याज' या फाउंडेशनच्या वतीने आज (बुधवारी) पालिका शाळेतील 2000 विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक गणपती बाप्पांच्या सुबक, मोहक मूर्ती घडवण्यात आल्या. त्या गणेश मुर्तींचं उद्घाटन आणि विद्यार्थ्यांचा गौरव या कार्यक्रमाचं आयोजन अमृता फडणवीस यांच्या 'दिव्याज फाउंडेशन'च्या वतीनं करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खान, गायक सोनू निगम, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगरानी, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी दिग्गज आवर्जून उपस्थित राहिले.

अमृता फडणवीस (reporter)
'इको फ्रेंडली' गणेशोत्सव : काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी 2000 पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणपती तयार केले होते. त्या मुर्तींचं प्रदर्शन मांडण्यात आलं होतं. दैनंदिन आयुष्यातही पर्यावरणपूरक बाबींना प्रेरणा देण्यासाठी विविध उपक्रम 'दिव्याज फाउंडेशन'च्या माध्यमातून राबवण्यात येतात. यापूर्वी विविध उपक्रम, इको फ्रेंडली आणि पर्यावरण पूरक उत्सवांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी 'दिव्याज फाउंडेशन'नं पुढाकार घेतला आहे. राज्यभर या फाउंडेशनचे काम सुरू आहेत. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या सणांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण टाळण्यासाठी अधिकाधिक इको फ्रेंडली, पर्यावरणपूरक गणपती तयार केले पाहिजेत. तसेच इतर सणही पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता साजरे केले पाहिजेत, असं आवाहन यावेळी अमृता फडणवीस यांनी केलं. तसंच इवल्याशा हातांनी अतिशय देखण्या, सुंदर इको फ्रेंडली गणपती तयार केले आहेत. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असं म्हणत, बच्चे बोले मोरया... ही नवीन थीम 'इको फ्रेंडली' गणपतीच्या माध्यमातून आणली आहे. या ठिकाणी घडवलेल्या गणेश मूर्ती तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता आणि भक्तिभावाने बाप्पाची पूजा करू शकता, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केलं.

मुलं ही देशाचं भविष्य : "मुलं ही शक्ती आहेत, ह्या देशाची शान आणि भविष्य आहेत. तुम्ही सर्वांनी अतिशय सुंदर गणपती तयार केले आहेत, या शब्दांत मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी बालमूर्तीकारांच्या कलेचं कौतुक केलं. "आपल्या शहरात कचरा करणार नाही, याची शिकवण तुम्ही समाजात द्या, प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही जे इको फ्रेंडली आणि पर्यावरणपूरक असे गणपती घडवले आहेत, त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल," असं मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटलं. "तुम्ही सर्वांनी खूप छान इको फ्रेंडली गणपती बनवले आहेत. मी कचरा करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही, असं तुम्ही वागा. तुम्ही तुमच्या हातांनी उत्तम कला सादर केली आहे," अशी शाबासकीची थाप अभिनेता सलमान खाननं दिली. "तुम्ही केलेला इको फ्रेंडली गणेश बाप्पा मी घेऊन जाणार आणि यावर्षी त्याची पूजा करणार," असं म्हणत अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मुलांचा उत्साह वाढवला.

विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद : दरम्यान, मुंबईतील विविध पालिका शाळेतील 2000 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, नृत्य आदींचं सादरीकरण झालं. तसंच गायक सोनू निगम यांनी आपल्या गायनानं उपस्थितांना खिळवून ठेवलं. 'भाईजान'नं 'तेरा ही जलवा...' या गाण्यावर ठेका धरला. अमृता फडणवीस यांनीही आपल्या गाण्याची थोडक्यात झलक दाखवली.

हेही वाचा :

  1. गणपतीच्या मूर्तींसाठी 'भाईजान'नं सांगितली महत्त्वाची गोष्ट, चाहत्यांना केलं आवाहन - Ganesh Chaturthi

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.