ETV Bharat / entertainment

आलिया भट्ट स्टारर 'जिगरा'मधील 'चल कुडिए' झालं प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt - ALIA BHATT

Jigra Chal Kudiye song out: आलिया भट्टच्या आगामी 'जिगरा' चित्रपटातील 'चल कुडिए' हे गाणं रिलीज झालं आहे. दिलजीत दोसांझनं या गाण्याला आपल्या सुरांनी आणखी सुंदर बनवलं आहे.

Jigra Chal Kudiye song out
जिगरामधील 'चल कुडिए' गाणं आऊट (जिगरा (Song Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 4:31 PM IST

मुंबई -Jigra Chal Kudiye song out: आलिया भट्ट स्टारर 'जिगरा'चं 'चल कुडिए' हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. निर्मात्यांनी दिलजीत दोसांझ आणि आलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. 'जिगरा' हा 2024 च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'इक कुडी' या हिट ट्रॅकच्या आठ वर्षांनंतर दिलजीत आणि आलिया यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.आलियानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यात दोघांनी या सुंदर ट्रॅकसाठी एकत्र काम केल्याचं दिसत आहे. हे गाणं महिला सक्षमीकरणावर आधारित आहे.

'जिगरा'मधील पहिला ट्रॅक रिलीज : आलियानं हा ट्रॅक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'चल कुडिए' हे गाणं नुकतंच आलं आहे, 'जिगरा' थिएटरमध्ये, 11 ऑक्टोबर रोजी.' या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "आलिया सुपरस्टार आहे." दुसऱ्यानं लिहिलं, "सुरुवातीच्या संवादानं मला प्रभावित केलं." या गाण्यात आलियाचा आवाज दिलजीतच्या एनर्जीशी जुळत आहे. या म्यूझिक व्हिडिओमध्ये दिलजीत व्हाइट आउटफिटमध्ये दिसत आहे. तर आलियानं काळा टी-शर्ट परिधान केला आहे. या टी-शर्टवर 'घर' असं लिहिलं आहे. हे गाणं आता सारेगामा यूट्यूब चॅनल आणि सर्व ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

'जिगरा'चा टीझर : 'जिगरा' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, नुकताच एक टीझर रिलीज करण्यात आला होता. हा टीझर पाहून चाहते थक्क झाले होते. टीझरच्या सुरुवातीला आलिया हॉटेलमध्ये ड्रिंक करत असताना आणि तिच्या भावाविषयी बोलताना दिसते. यात ती म्हणते की तिच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि तिला खूप काही करायचे आहे. यानंतर वेदांग रैनाला अटक करण्यात येते, आलिया आपल्या भावाला सोडवण्याचा प्रयत्न करताना यात दिसते. या टीझरमध्ये तिनं काही ॲक्शन सीन्स केले आहेत.

'जिगरा' चित्रपटाबद्दल : वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा'मध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे, तर वेदांग रैना तिच्या भावाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट वायकॉम18 स्टुडिओ, धर्मा प्रॉडक्शन आणि इटरनल सनशाइन प्रॉडक्शन यांनी प्रस्तुत केला आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता, आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि सोमेन मिश्रा यांनी केली आहे. जिगरा 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा झाली आजी नीतू कपूरला पाहून सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल - raha kapoor
  2. रणबीर कपूर आलिया भट्ट, विकी कौशल स्टारर 'लव्ह अँड वॉर'ला मिळाली नवीन रिलीज तारीख - Love and War Release Date
  3. 'जिगरा'मधील आगामी ट्रॅकमध्ये आलिया भट्टबरोबर दिसणार दिलजीत दोसांझ, नवीन गाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्र - Alia Bhatt

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.