ETV Bharat / entertainment

चिखलात लोळल्यानंतर 'उंचा लंबा कद' गाण्यावर थिरकला अक्षय कुमार - बडे मियाँ छोटे मियाँ

अक्षय कुमारने जॉर्डनमध्ये 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. पॅकअपनंतर त्याने टायगर श्रॉफसह टीमसोबत 'मड बाथ'चा आनंद लुटला. त्यानंतर त्याने त्याच्या 'वेलकम' चित्रपटातील 'उंचा लंबा कद' गाण्यावर कोरिओग्राफर बॉस्को मार्टिससोबत नाच केला. त्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

Akshay Kumar
अक्षय कुमार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 10:36 AM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या शूटिंगसाठी जॉर्डनमध्ये दाखल झाला आहे. या ठिकाणी संपूर्ण क्रू आणि कलाकार अतिशय मेहनतीनं कामात गुंतले असताना चित्रपटाच्या सेटवरील अक्षयचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यामध्ये तो 'वेलकम' चित्रपटातील त्याच्या 'उंचा लंबा कद' या आयकॉनिक ट्रॅकवर थिरकताना दिसत आहे.

कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस या गाण्यामध्ये अक्षयसोबत नाचताना दिसत आहे. त्यानेच हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, "अक्षय कुमार सरांसोबत काम करणे नेहमीच आनंददायी असते! अशा प्रकारे आम्ही 'उंचा लंबा कद' तयार करु शकतो. निरोगी जगण्यासाठी आणि अगदी कठीण परिस्थितीतही आपल्या सर्वांना हसण्याची प्रेरणा दिल्याबद्दल अक्षय सरांचे खूप खूप आभार. लव्ह यू सर."

व्हिडिओ शेअर होताच अक्षयच्या चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील सहकाऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. 'वेलकम' चित्रपटातील मूळ गाण्यात अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या कतरिना कैफने प्रतिक्रिया देऊन 'हे गाणं खूप मजेदार होतं', असं म्हटलंय.

अनीस बज्मी दिग्दर्शित 'वेलकम' हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफ, अनिल कपूर, नाना पाटेकर, परेश रावल, दिवंगत अभिनेता फिरोज खान आणि मल्लिका शेरावत यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याकाळी ब्लॉकबस्टर ठरलेला हा चित्रपट बॉलिवूडच्या सर्वात मजेदार चित्रपटांपैकी एक मानला जातो.

'वेलकम' नंतर 'वेलकम बॅक'चा सिक्वेलही आला होता. यामध्ये जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांनीही भूमिका साकारल्या होत्या. आता 'वेलकम टू द जंगल' या वेलकमच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार दिसणार आहे. 'वेलकम 3'चे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये दिशा पटानी, सुनील शेट्टी, परेश रावल, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, संजय दत्त, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, किकू शारदा, दलेर मेहंदी, मिका सिंग, राहुल देव, मुकेश तिवारी, शारीब हाश्मी, इनाममुलहक, झाकीर हुसेन आणि यशपाल शर्मा अशी दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

'बडे मियाँ छोटे मियाँ' या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर अक्षय आणि टायगर श्रॉफने या चित्रपटाचे अखेर शूटिंग पूर्ण केले आहे. या दोघांनी गुरुवारी चित्रपट पूर्ण झाल्याचा आनंद टीमसह 'मड बाथ' घेऊन साजरा केला. गुरुवारी, अक्षयने इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि काळ्या चिखलात माखलेल्या टायगरचा एक आनंदी फोटो शेअर केला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, "त्याच जुन्या मीम्सला तुम्ही जर कंटाळला असाल, तर तुमच्यासाठी इथे काही नवीन मड-टेरियल आहे. जॉर्डनमधील डेड सी येथे 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या या संस्मरणीय शेड्यूलचा शेवट आम्ही अशा प्रकारे साजरा केला. हा एक 'रॅप' आहे!"

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मुंबई, लंडन, अबू धाबी, स्कॉटलंड आणि जॉर्डन सारख्या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला हा पॅन इंडिया चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन या खलनायकाच्या भूमिकेत असून यामध्ये सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.

याशिवाय अक्षय कुमार आगामी तमिळ ड्रामा चित्रपट 'सूराराई पोत्रू'च्या हिंदी रिमेकमध्ये देखील दिसणार आहे. हा चित्रपट 16 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होईल.

हेही वाचा -

  1. पूनम पांडेच्या मृत्यूवर चाहत्यांचा विश्वास बसेना! सोशल मीडियावर चर्चांना उधाण
  2. गीतकार जावेद अख्तर यांना दिलासा, तर कंगना रणौतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
  3. यशराजच्या महिला गुप्तहेर फ्रेंचायझीचा दिग्दर्शक ठरला, आलियासोबत शर्वरी वाघ साकारणार 'सुपर एजंट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.